वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालकांना आवडले नागपूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 01:07 AM2018-04-18T01:07:31+5:302018-04-18T01:07:40+5:30
जगभरातील व्यापाराशी निगडित असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रादेशिक संचालक झुबेन जाल यांनी नागपूर आवडल्याची क बुली दिली. जाल यांच्या नेतृत्वात एक टीम नागपूरची प्राथमिक चाचपणी करण्यासाठी आली होती. या टीमचे नागपुरात येणे आणि संचालकाला नागपूर आवडणे हे व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टिकोनातून चांगला संकेत समजला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरातील व्यापाराशी निगडित असलेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरचे प्रादेशिक संचालक झुबेन जाल यांनी नागपूर आवडल्याची क बुली दिली. जाल यांच्या नेतृत्वात एक टीम नागपूरची प्राथमिक चाचपणी करण्यासाठी आली होती. या टीमचे नागपुरात येणे आणि संचालकाला नागपूर आवडणे हे व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टिकोनातून चांगला संकेत समजला जात आहे.
उद्योग क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या टीमने आज नागपूरचा आढावा घेतला. जगभरात वर्ल्ड ट्रेड सेंटरचे ३०० हून अधिक केंद्र आहेत. त्यातील ३० सेंटर्स भारतात आहेत. त्यापैकी मुंबई आणि पुणे अशी दोन केंद्रे महाराष्ट्रात आहेत. वेगाने विस्तारणाºया नागपूर शहरात वर्ल्ड ट्रेड सेंटर व्हावे, उद्योगास चालना मिळावी म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. या टीमने मार्केट एरिया, रस्ते, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो रेल्वे आदी ठिकाणी भेट देऊन शहराची पाहणी केली.
पत्रकारांशी बोलताना जाल म्हणाले की, प्रथमदर्शनी मला नागपूर खूप आवडले आहे. वाहतुकीची होणारी कोंडी अथवा नसणारी पर्याप्त साधने इतकी एक अव्यवस्था आहे, मात्र मेट्रो रेल्वे ज्या पध्दतीने काम करीत आहे, ते बघून हा प्रकार देखील लवकरच दूर होईल असे निदर्शनास येत आहे.
जगभरातील व्यापाऱ्याना एकमेकांशी जोडणे, उद्योग व्यापाराशी संबंधित विषयांवर चर्चा घडवून आणणे, प्रदर्शने भरविणे, उद्योग पूरक वातावरण निर्मिती करणे अशी कामे वर्ल्ड ट्रे़ड सेंटर तर्फे राबविली जातात. आम्ही कुठल्याही शहरात जातो, तेव्हा मार्केटचा परिसर बघतो. तो आम्हास व्यवस्थित वाटल्यास तिथे एक लायसन्सी नियुक्त करतो. त्याच्या माध्यमातून इमारत बांधतो आणि तेथील गाळे त्यांच्याच माध्यमातून व्यापाऱ्याना विकतो. नागपुरात देखील आम्ही असाच लायसन्सी शोधू.
स्मार्ट सिटीतील शहरांकडे फोकस
सरकारने स्मार्ट सिटीच्या निमित्ताने काही शहरांचा सर्व्हे केला आहे. त्यातून जी शहरे विकासाच्या दृष्टीने सक्षम वाटली त्या शहरावर त्यांचा फोकस राहणार आहे. आम्ही देखील अशा शहरांवर आपले लक्ष केंद्रित करीत आहोत. तिथे उद्योगासाठी पूरक असे वातावरण तयार करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.
सीताबर्डी परिसरात केंद्र बनण्याची अपेक्षा
मेट्रोच्या दोन लाईन ज्या भागात एकमेकांना क्रॉस होतात, त्या परिसरात आमचे सेंटर असावे अशी आमची अपेक्षा असते. सगळे काही अंतिम झाले की किमान अडीच ते तीन वर्षात सेंटरचे कार्य सुरू होते, असेही जाल म्हणाले. यावेळी त्यांच्या सोबत अतुल गोयल उपस्थित होते.
सरकारने केलेले कायदे ग्राहक हिताचे
नोटाबंदी, जीएसटी, महारेरा हे सगळे कायदे ग्राहकाचे अंतिम हीत डोळ्यासमोर ठेवून बनविण्यात आले आहेत. त्याचा चांगला परिणाम जाणवेल. रिअल इस्टेट मार्केटवर त्याचा वाईट परिणाम होणार नाही. नागपुरात आमची चाचपणी सुरू आहे, लवकरच आम्ही सगळ्या काही निर्णयांना अंतिम स्वरूप देऊ असेही जाल म्हणाले.