मेट्रोत प्रवास करायला आवडेल :अमोल कोल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 01:40 AM2018-12-28T01:40:30+5:302018-12-28T01:41:12+5:30
वेगाने पूर्ण होणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पामुळे नागपूर शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य पूर्ण होताच मला मेट्रोत बसायला आवडेल, अशी इच्छा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेगाने पूर्ण होणाऱ्या नागपूरमेट्रो प्रकल्पामुळे नागपूर शहराची नवी ओळख निर्माण झाली आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य पूर्ण होताच मला मेट्रोत बसायला आवडेल, अशी इच्छा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केली.
सध्या नागपुरात गाजत असलेल्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यासाठी नागपुरात आलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी गुरुवारी महामेट्रो नागपूरच्या झिरो माईल येथील माहिती केंद्राला भेट दिली. शहरात मेट्रो प्रकल्पाचे कार्य सुरू असतानाच सामाजिक व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नागरिकांना सुविधा देण्यासाठी महामेट्रो प्रशासन कटिबद्ध असल्याची बाब अभिमानाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महामेट्रो नागपूरच्या ‘धावणार माझी मेट्रो’ मोहिमेला नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून या मोहिमेची कोल्हे यांनी प्रशंसा केली. ‘विश वॉल’वर त्यांनी महामेट्रोच्या कार्याचे अभिनंदन करून राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
याप्रसंगी महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पाची माहिती दिली. माहिती केंद्रासह लावण्यात आलेले ‘सेल्फी पॉर्इंट’चे नागरिकांमध्ये आकर्षण आहे. तसेच नागपूर मेट्रो फेसबुक पेजच्या माध्यमातून नागरिक नेहमीच मेट्रोच्या संपर्कात असतात. अतिशय कमी वेळेत ४.५ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स नागपूर मेट्रोच्या फेसबुक पेजवर आहेत. देशातील सर्व शासकीय विभागामध्ये नागपूर मेट्रोचे फेसबुक पेज प्रथम क्रमांकावर असण्याचा गौरव नागपूर मेट्रोने प्राप्त केल्याचे त्यांनी सांगितले.