यंदा तूर डाळ कंबरडे मोडणार : एक महिन्यातच हजार रुपये महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 08:37 PM2018-11-17T20:37:18+5:302018-11-17T20:39:20+5:30

सामान्य नागरिकांपासून ते उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूरडाळीच्या भावाने यंदा कंबरडे मोडणार आहे. एक महिन्यातच क्विंटलमागे हजार रुपयांची वाढ होऊन घाऊकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ६२ ते ६८ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये ७० ते ७५ रुपयांत विक्री सुरू आहे. डाळीप्रमाणेच तुरीचे भावही हजार रुपयांनी वाढले आहेत. पुढेही भाववाढीची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

This year, tur dal will break down shrunken: in a month thousands of rupees are expensive | यंदा तूर डाळ कंबरडे मोडणार : एक महिन्यातच हजार रुपये महाग

यंदा तूर डाळ कंबरडे मोडणार : एक महिन्यातच हजार रुपये महाग

Next
ठळक मुद्देशासनाने लक्ष द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सामान्य नागरिकांपासून ते उच्चभ्रू नागरिकांपर्यंत सर्वांच्या ताटातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून गणल्या जाणाऱ्या तूरडाळीच्या भावाने यंदा कंबरडे मोडणार आहे. एक महिन्यातच क्विंटलमागे हजार रुपयांची वाढ होऊन घाऊकमध्ये दर्जानुसार भाव प्रति किलो ६२ ते ६८ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळमध्ये ७० ते ७५ रुपयांत विक्री सुरू आहे. डाळीप्रमाणेच तुरीचे भावही हजार रुपयांनी वाढले आहेत. पुढेही भाववाढीची शक्यता असल्याचे मत व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
तुरीचे पीक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येणार आहे. गेल्यावर्षी भाव न मिळाल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाकडे दुर्लक्ष करून कापूस पिकावर लक्ष केंद्रित केले. याशिवाय कमी पावसामुळे यावर्षी तुरीचे पीक कमी येण्याचा कृषी तज्ज्ञांचा अंदाज आहे. या सर्व बाबी हेरून व्यापाऱ्यांनी आतापासून तूर डाळीचे भाव वाढविण्यास सुरू केली केली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास तूर डाळ पुन्हा १०० रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.

तुरीचे उत्पादन घटण्याचा अंदाज
धान्य व्यापाऱ्यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तूर डाळीचे भाव प्रति किलो १८० ते २०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. वाढलेल्या भावामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले होते. भाव सामान्यांच्या आवाक्यात यावेत, यासाठी सरकारने सुद्धा प्रयत्न सुरू केले होते. शिवाय आयातही सुरू केली होती. मात्र तुरीचे उत्पादन जास्त झाल्यामुळे दोन महिन्यांतच तूरडाळीचे भाव वेगाने घाऊकमध्ये दर्जानुसार ५० रुपयांपर्यंत कमी झाले होते. भाव कमी झाल्यानंतरही ग्राहकांकडून फारशी मागणी नव्हती. या सर्व घडामोडीचा फटका व्यापाऱ्यांना बसला आणि अनेक दाल मिल बंद पडल्या. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तूरडाळीचा साठा केलाच नाही. पण यावर्षी पीक कमी येण्याच्या अंदाजामुळे व्यापाऱ्यांनी सावधतेने पावले उचललेली आहेत.

केंद्राने वाढविली आधारभूत किंमत
गेल्यावर्षी तुरीला भाव कमी मिळाल्यामुळे केंद्र सरकारने आधारभूत किंमत ५९०० रुपयांपर्यंत वाढविली आहे. एवढ्या किमतीत तूर खरेदी करणारा व्यापारी वाढीव भावातच डाळ विकणार आहे. शिवाय पीक कमी येण्याचा अंदाज खरा ठरल्यास भाव झपाट्याने वाढतील आणि पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

सर्वच कडधान्य महागले
तूरडाळीप्रमाणेच मागील महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये हरभरा डाळ, मूग डाळ, मसूर डाळीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. हरभरा डाळीच्या किमतीत घाऊकमध्ये प्रति किलो १२ रुपयांची वाढ होऊन भाव ६० ते ६२ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तसेच उडीद मोगर प्रति किलो ८ रुपये, मूग मोगर ८ रुपये, मसूर डाळ ३ रुपये, मूग डाळ ३ रुपये, देशी हरभरा ४ रुपये, ज्वारी ५ रुपये, काबुली चण्याचे भाव ५ रुपयांनी वाढले असून भाववाढीची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

 

Web Title: This year, tur dal will break down shrunken: in a month thousands of rupees are expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.