शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
7
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
8
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
9
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
10
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
11
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
12
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
13
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
14
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
16
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
17
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
18
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
19
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
20
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"

नागपूरसह संपूर्ण विदर्भात येलो अलर्ट, अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 5:33 PM

विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पुढील ४८ तासात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुढील तीन दिवस पश्चिम विदर्भासाठीही येलो अलर्ट आहे.

ठळक मुद्देनांद, वडगाव धरणाचे गेट उघडले : वणा नदीकाठावरील जनतेला हाय अलर्टपश्चिम विदर्भासाठीही पुढील तीन दिवस दक्षतेचे, वादळी वाऱ्यासह वीज व अतिवृष्टीची शक्यता

नागपूर : नागपूरसह सर्वच जिल्ह्यात मागील २४ तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत. वडगाव आणि नांद या दोन्ही धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वणा नदीला पूर आला आहे. यामुळे प्रशासनाने या नदीकाठावरील गावकऱ्यांना हाय अलर्ट जारी केला आहे. पुढील ४८ तासात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुढील तीन दिवस पश्चिम विदर्भासाठीही येलो अलर्ट आहे.

अतिवृष्टीमुळे मंगळवारी सकाळी वडगाव धरणाचे ३ दरवाजे व नांद धरणाचे ७ दरवाजे उघडण्यात आले आहेत. नागपूर, उमरेड या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. यामुळे या भागातून येणारे पाणी थेट या दोन्ही धरणक्षेत्रात जमा होत असल्याने ही दोन्ही धरणे पूर्णत: भरली आहे. हवामान विभागाने २१ ते २४ सप्टेंबर या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना पुढील २४ तास येलो अलर्ट दिला असून हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी वादळीवाऱ्या सह वीज व अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

तर आणीबाणीची स्थिती

वडगाव आणि नांदचे दरवाजे उघडल्याने वणा नदीला पूर येण्याची शक्यता आहे. सध्या कोणताही धोका नसला तरी मुसळधार पाऊस झाल्यास आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे संभाव्य धोक्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

धरणे पूर्णत्वाकडे

मागील चार दिवसातील पावसामुळे धरणांची पातळी बरीच वाढली आहे. नागपूर विभागातील पेंच तोतलाडोह ८६.३७ टक्के, तर बाघ शिरपूर धरणही ८३.९८ टक्के भरले आहे. अमरावती विभागातील उर्ध्व वर्धा, काटेपूर्णा, अरूणावती ही धरणे ९९ टक्क्यांच्या जवळपास भरली असल्याने १०० टक्के भरल्यावर केव्हाही गेट उघडावे लागू शकतात, अशी स्थिती आहे. बेंबळा, वणा ही धरणेही ९५ टक्क्यांवर आली आहेत. यामुळे गावकऱ्यांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

पाऊस (दु. २ वाजेपर्यंत)

वर्धा : २८.५ मिमीनागपूर : ३० मिमी

भंडारा : ३३.७ मिमीगोंदीया : १० मिमी

चंद्रपूर : ३९.२ मिमीगडचिरोली : २०.१ मिमी

सरासरी : २७.६ मिमी 

धरणातील पाणीसाठानागपूर विभाग

पेंच तोतलाडोह : ८६.३७इटीयाडोह : ७१.८१

बाघ शिरपूर : ८३.९८गोसेखुर्द : ६२.१२

इरई : ७४.०९

अमरावती विभाग

उर्ध्व वर्धा : ९८.२०बेंबळा : ९३.३८

अरूणावती : ९८.८३काटेपूर्णा : ९९.४७

वाण : ९५.५५पेनटाकळी : ५५.८९

खडकपूर्णा : ८९.७२

वैनगंगा, बाघ धोक्याच्या पातळीवरजिल्हा : नदी : ठिकाण : धोक्याची पातळी : आजची पातळी

(पातळी मीटरमध्ये)गोंदिया : बाघ : रजेगाव काठी : २८० : २८१.३०

भंडारा : वैनगंगा : कारधापूल : २४५ : २४४.१०भंडारा : वैनगंगा : पवनी : २२६.७४ : २२२.२०

नागपूर : कन्हान : माथनी : २६३.७२ : २५१.९८गोंदिया : वैनगंगा : देवरी : २७७.३० : २७०.६०

गोंदिया : बावनथडी : महालगाव : २६३.५० : २५८.२०वर्धा : वेणा : हिंगणघाट : २१२.२४ : २०३.२७

चंद्रपूर : वैनगंगा : वाघुली बुटी : २१२.३१ : २०५.९२गडचिरोली : वैनगंगा : वडसा : २१५.२० : २५७.८७

टॅग्स :Rainपाऊसweatherहवामान