खापरखेडा : काेलार नदीच्या पात्रात अंघाेळ करण्यासाठी उतरलेला तरुण खाेल पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदा (काेराडी) शिवारात नुकतीच घडली.
प्रमाेद गणपत माेहनकर (३०, रा. नांदा काेराडी, ता. कामठी) असे मृताचे नाव आहे. प्रमाेद मंगळवारी (दि. १४) सायंकाळी काेलार नदीच्या पात्रात अंघाेळ करण्यासाठी उतरला हाेता. पाय घसरल्याने ताे प्रवाहात आला आणि वाहत गेला. ही बाब लक्षात येताच पाेलिसांनी शाेधकार्य सुरू केले. दरम्यान, त्याचा मृतदेह शुक्रवारी (दि. १७) सकाळी ८ वाजताच्या सुमारास माैदा परिसरातील कन्हान नदीच्या काठावर तरंगताना आढळून आला. त्याची ओळख पटल्यानंतर खापरखेडा पाेलिसांनी रविवारी (दि. १९) अकस्मात मृत्यूची नाेंद केली. या घटनेचा तपास पाेलीस हवालदार नावेद खान करीत आहेत.