तरुणीने अल्पवयीन मुलीला पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:11 AM2021-05-05T04:11:05+5:302021-05-05T04:11:05+5:30
नागपूर : बारावीत शिकणाऱ्या एका तरुणीने तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला पळवून नेले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. सुहानी ...
नागपूर : बारावीत शिकणाऱ्या एका तरुणीने तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला पळवून नेले. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सुहानी कावळे (१९) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. ती उप्पलवाडीत राहते. कोतवालीतील १५ वर्षीय मुलीसोबत तिची अनेक दिवसांपासून मैत्री आहे. त्या दोघी नेहमी बाहेर फिरायला जायच्या. त्यामुळे घरच्यांची रोकटोक नव्हती. ३० एप्रिलला सकाळी ९.३० वाजता पीडित मुलगी घरून दूध आणण्याच्या बहाण्याने बाहेर गेली. रात्र झाली, तरी ती परत आली नाही. त्यामुळे घरच्यांनी तिची शोधाशोध सुरू केली. सुहानीकडे संपर्क करण्यात आला. ती सुहानीसोबत गेल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पालकांनी वाट बघायचे ठरविले. आता तीन दिवस होऊनही या दोघी घरी परतल्या नाही. त्यामुळे पालकांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी सुहानीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तिचा आणि बेपत्ता मुलीचा शोध घेतला जात आहे.
----