अल्पवयीन मुलांनी केला गुंडाचा खून

By admin | Published: November 2, 2015 02:08 AM2015-11-02T02:08:15+5:302015-11-02T02:08:15+5:30

दारू व सिगारेटसाठी त्रास देणाऱ्या एका तडीपार गुंडाचा त्याच्याच दोन अल्पवयीन साथीदारांनी खून केला.

Younger children murder the punk | अल्पवयीन मुलांनी केला गुंडाचा खून

अल्पवयीन मुलांनी केला गुंडाचा खून

Next

गिट्टीखदान परिसरातील घटना :पोलिसांचा निष्काळजीपणा उघडकीस
नागपूर : दारू व सिगारेटसाठी त्रास देणाऱ्या एका तडीपार गुंडाचा त्याच्याच दोन अल्पवयीन साथीदारांनी खून केला. शनिवारी मध्यरात्री गिट्टीखदान परिसरातील पंचशील नगर येथे ही घटना घडली. दोन्ही अल्पवीय आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रोहित गुणवंत सोनेकर (२३) रा. अजनी असे मृत तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याला अजनी पोलिसांनी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपार झाल्यापासून रोहित गिट्टीखदान चौकातील पंचशीलनगर येथे राहत होता. यादरम्यान वस्तीतील १७ वर्षीय आरोपीसोबत त्याची ओळख झाली. या अल्पवयीन आरोपीचा त्याचाच वयाचा एक मित्र जरीपटक्यात राहतो. रोहित स्वत:चा गुन्हेगारी रेकॉर्ड सांगून दोघांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना दारू व सिगारेटसाठी पैसे मागायचा. खर्रा आणायला पाठवायचा. सुरुवातीला काही दिवस दोघांनी रोहितचे ऐकले. रोहित रोजच त्यांना बोलावून दारू व सिगारेटसाठी पैसे मागू लागला. त्यांना मारहाणसुद्धा करू लागला. तो गुंड असल्याने दोघेही त्याला घाबरून राहायचे. त्याचा त्रासाला दोघेही कंटाळले होते. शनिवारी सायंकाळी ६ वाजता रोहितने दोघांनाही मारहाण केली. तेव्हा रोहितला संपविण्याचा त्यांना निर्णय घेतला. रात्री १ वाजता त्या दोघांचा रोहितसोबत पुन्हा वाद झाला. पंचशीलनगरातील झेंडा चौकात दोघांनीही धारदार शस्त्रांनी वार करून रोहितचा खून केला. वस्तीतील नागरिकांनी गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली. पीएसआय नितीन मदनकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रस्त्यात दोघेही अल्पवयीन संदिग्ध अवस्थेत जातांना दिसले. त्यांची विचारपूस केली असता दोघांनीही खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक केली. एक अल्पवयीन दहावीचा विद्यार्थी आहे. दोघांनाही बाल सुधार गृहात पाठविण्यात आले आहे.
या घटनेत पोलिसांचा निष्काळजीपणा सुद्धा उघडकीस आला आहे. रोहित अजनीतून तडीपार होऊन मागील सहा महिन्यांपासून गिट्टीखदान येथील पंचशीलनगरात राहत होता. गिट्टीखदान पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पंचशीलनगर आहे. सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये डीबी चमू असते. बाहेरचा गुन्हेगार वस्तीत येऊन भाड्याने राहत असूनही पोलिसांना माहिती मिळत नाही, हे आश्चर्यजनक आहे. (प्रतिनिधी)

एका महिन्यात १२ खून
आॅक्टोबर महिन्यात एका बालकासह १२ जणांचे खून करण्यात आले. ३ आॅक्टोबर रोजी हुडकेश्वरमध्ये प्रशांत पुसदकर याचा खून करण्यात आला. ७ आॅक्टोबरला तात्या टोपेनगर येथे जयश्री बाळ यांची हत्या करण्यात आली. ११ आॅक्टोबरला सोनेगाव येथे एका तरुणाने आईच्या मदतीने मारहाण करणाऱ्या वडिलांचा खून केला. १७ आॅक्टोबरला जरीपटका येथे एका व्यक्तीने आपली पत्नी व साळ्याच्या मुलाचा खून केला. पाचपावलीमध्ये मो. ताहीरने मुलगा इमरानच्या मदतीने संपत्ती वादात लहान भाऊ शाकीरचा खून केला. १८ आॅक्टोबरला गिट्टीखदानमध्ये मिथिलेश बोरकरने पत्नी स्वातीला जाळून मारले. २३ आॅक्टोबरला सोनेगावमध्ये दीपक चंद्रिकापुरेने पत्नी नलूचा खून केला. २७ आॅक्टोबरला विडी न दिल्याच्या कारणावरून एका वृद्ध मजुराचा खून करण्यात आला.

Web Title: Younger children murder the punk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.