शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

अल्पवयीन मुलांनी केला गुंडाचा खून

By admin | Published: November 02, 2015 2:08 AM

दारू व सिगारेटसाठी त्रास देणाऱ्या एका तडीपार गुंडाचा त्याच्याच दोन अल्पवयीन साथीदारांनी खून केला.

गिट्टीखदान परिसरातील घटना :पोलिसांचा निष्काळजीपणा उघडकीसनागपूर : दारू व सिगारेटसाठी त्रास देणाऱ्या एका तडीपार गुंडाचा त्याच्याच दोन अल्पवयीन साथीदारांनी खून केला. शनिवारी मध्यरात्री गिट्टीखदान परिसरातील पंचशील नगर येथे ही घटना घडली. दोन्ही अल्पवीय आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रोहित गुणवंत सोनेकर (२३) रा. अजनी असे मृत तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याला अजनी पोलिसांनी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले होते. तडीपार झाल्यापासून रोहित गिट्टीखदान चौकातील पंचशीलनगर येथे राहत होता. यादरम्यान वस्तीतील १७ वर्षीय आरोपीसोबत त्याची ओळख झाली. या अल्पवयीन आरोपीचा त्याचाच वयाचा एक मित्र जरीपटक्यात राहतो. रोहित स्वत:चा गुन्हेगारी रेकॉर्ड सांगून दोघांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना दारू व सिगारेटसाठी पैसे मागायचा. खर्रा आणायला पाठवायचा. सुरुवातीला काही दिवस दोघांनी रोहितचे ऐकले. रोहित रोजच त्यांना बोलावून दारू व सिगारेटसाठी पैसे मागू लागला. त्यांना मारहाणसुद्धा करू लागला. तो गुंड असल्याने दोघेही त्याला घाबरून राहायचे. त्याचा त्रासाला दोघेही कंटाळले होते. शनिवारी सायंकाळी ६ वाजता रोहितने दोघांनाही मारहाण केली. तेव्हा रोहितला संपविण्याचा त्यांना निर्णय घेतला. रात्री १ वाजता त्या दोघांचा रोहितसोबत पुन्हा वाद झाला. पंचशीलनगरातील झेंडा चौकात दोघांनीही धारदार शस्त्रांनी वार करून रोहितचा खून केला. वस्तीतील नागरिकांनी गिट्टीखदान पोलिसांना सूचना दिली. पीएसआय नितीन मदनकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रस्त्यात दोघेही अल्पवयीन संदिग्ध अवस्थेत जातांना दिसले. त्यांची विचारपूस केली असता दोघांनीही खुनाची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना अटक केली. एक अल्पवयीन दहावीचा विद्यार्थी आहे. दोघांनाही बाल सुधार गृहात पाठविण्यात आले आहे. या घटनेत पोलिसांचा निष्काळजीपणा सुद्धा उघडकीस आला आहे. रोहित अजनीतून तडीपार होऊन मागील सहा महिन्यांपासून गिट्टीखदान येथील पंचशीलनगरात राहत होता. गिट्टीखदान पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पंचशीलनगर आहे. सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये डीबी चमू असते. बाहेरचा गुन्हेगार वस्तीत येऊन भाड्याने राहत असूनही पोलिसांना माहिती मिळत नाही, हे आश्चर्यजनक आहे. (प्रतिनिधी)एका महिन्यात १२ खून आॅक्टोबर महिन्यात एका बालकासह १२ जणांचे खून करण्यात आले. ३ आॅक्टोबर रोजी हुडकेश्वरमध्ये प्रशांत पुसदकर याचा खून करण्यात आला. ७ आॅक्टोबरला तात्या टोपेनगर येथे जयश्री बाळ यांची हत्या करण्यात आली. ११ आॅक्टोबरला सोनेगाव येथे एका तरुणाने आईच्या मदतीने मारहाण करणाऱ्या वडिलांचा खून केला. १७ आॅक्टोबरला जरीपटका येथे एका व्यक्तीने आपली पत्नी व साळ्याच्या मुलाचा खून केला. पाचपावलीमध्ये मो. ताहीरने मुलगा इमरानच्या मदतीने संपत्ती वादात लहान भाऊ शाकीरचा खून केला. १८ आॅक्टोबरला गिट्टीखदानमध्ये मिथिलेश बोरकरने पत्नी स्वातीला जाळून मारले. २३ आॅक्टोबरला सोनेगावमध्ये दीपक चंद्रिकापुरेने पत्नी नलूचा खून केला. २७ आॅक्टोबरला विडी न दिल्याच्या कारणावरून एका वृद्ध मजुराचा खून करण्यात आला.