२४ तासात पावसाची नागपूरसह शून्य नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:07 AM2021-06-23T04:07:06+5:302021-06-23T04:07:06+5:30
नागपूर : मागील २४ तासांमध्ये नागपूर शहरासह विदर्भात पावसाची शून्य नोंद घेण्यात आली आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला ...
नागपूर : मागील २४ तासांमध्ये नागपूर शहरासह विदर्भात पावसाची शून्य नोंद घेण्यात आली आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला तरी त्याची नोंद मात्र झालेली नाही. जिल्ह्यात एकीकडे पावसाने सरासरी गाठली असली तरी चार दिवसांपासून पाऊस थंडावला आहे.
मंगळवारी दुपारी नागपुरात तुरळक पाऊस झाला. आभाळ भरून आले असले तरी दमदार पाऊस झाला नाही. सायंकाळीही पावसाचा पत्ता नव्हता. वातावरणात दमटपणा वाढल्याने सोमवारच्या रात्री उष्णतेमध्ये किंचीत वाढ झाली होती. मंगळवारी सकाळी आर्द्रता ६९ टक्के नोंदविण्यात आली, तर सायंकाळी ७२ टक्के नोंद झाली. शहरात दिवसभरातील तापमानात ०.२ अंशाने वाढ होऊन ३६.२ वर किमान तापमानाचा पारा होता.
२४ तासात विदर्भात पावसाची नोंद नसली तरी हवामान विभागाने दुपारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
...
विदर्भातील तापमान
जिल्हा : कमाल : किमान
अकोला : ३५.५ : २४.४
अमरावती : ३४.६ : २४.०
बुलडाणा : ३२.४ : २३.६
चंद्रपूर : ३६.६ : २६.४
गडचिरोली : ३५.२ : २६.४
गोंदिया : ३४.४ : २५.५
नागपूर : ३६.२ : २५.६
वर्धा : ३६.५ : २५.६
वाशिम : अप्राप्त : २०.२
यवतमाळ : ३५.८ : २५.०
...