जि.प.कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार

By admin | Published: November 2, 2015 02:14 AM2015-11-02T02:14:48+5:302015-11-02T02:14:48+5:30

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे ..

ZP staff will question the questions | जि.प.कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार

जि.प.कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणार

Next

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ग्वाही : कर्मचारी युनियनसोबत चर्चा
नागपूर : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी महाराष्ट्र राज्य जि.प.कर्मचारी युनियन (ओंकारप्रणित) च्या नागपूर शाखेच्या शिष्टमंडळाला दिले.
विविध संवर्गीय पदोन्नती दिवाळीपूर्वी द्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कनिष्ठ आरोग्य सहायकावर लादलेले अतिरिक्त काम कमी करावे,आॅनलाईन समायोजन होईपर्यंत वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांना आॅफलाईन वेतन देण्यात यावे. अपंग कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार प्रतिनियुक्ती देण्यात यावी.
आश्वासित योजनेंतर्गत कालबद्ध पदोन्नती प्रस्ताव तात्काळ निकाली काढण्यात यावेत. भविष्य निर्वाह निधीच्या प्रकरणात अधिक सुलभता आणावी व कर्मचाऱ्यांची वैयक्तिक प्रकरणे निकाली काढण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
बैठकीला जि.प.चे विभाग प्रमुख, संघटनेचे अध्यक्ष संजयसिंग, सरचिटणीस अरविंद अंतूरकर, उपाध्यक्ष अशोक शिकारे, कोषाध्यक्ष अरुण थापे, किशोर भिवगडे, लेगा संघटनेचे राज्य सरचिटणीस सुदाम पांगुळ, सुजित अढाऊ , हेमंत मुडानकर, संतोष जगताप, मधुकर पाटील, सुभाष पडोळे, नंदा मानकर, चतुर्थ श्रेणी संघटनेचे अध्यक्ष देवीदास राऊ त, चिंधबाजी दाढे, संजय चांदपूरकर, बढिये, सांबारे, बाफारे, तनुजा गावंडे श्यामकला गावंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: ZP staff will question the questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.