१६ गावांच्या १२ कोटींची कामे कागदावरच... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:23 AM2019-05-31T00:23:33+5:302019-05-31T00:25:21+5:30
तेलगंणा मुद्यावरून धर्माबाद तालुक्याला डिपीटीसीमधून ४० कोटी पैकी साडेबारा कोटी निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा झाले होते. धर्माबाद तालुक्यातील सोळा गावालगतचे रस्त्याचे कामाचे अंदाज पत्रकही तयार करण्यात आले. परंतु, जिल्हा परिषद विभाग, एनओसी देत नसल्याने साडेबारा कोटीचे कामे ‘जैसे थे’ पडून राहिले. गाजलेला तेलगंणा मुद्दा कागदावर पडून राहिला़
धर्माबाद : तेलगंणा मुद्यावरून धर्माबाद तालुक्याला डिपीटीसीमधून ४० कोटी पैकी साडेबारा कोटी निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा झाले होते. धर्माबाद तालुक्यातील सोळा गावालगतचे रस्त्याचे कामाचे अंदाज पत्रकही तयार करण्यात आले. परंतु, जिल्हा परिषद विभाग, एनओसी देत नसल्याने साडेबारा कोटीचे कामे ‘जैसे थे’ पडून राहिले. गाजलेला तेलगंणा मुद्दा कागदावर पडून राहिला़
धर्माबाद तालुक्यातील १६ गावासाठी १२ कोटी रूपयांची निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे उपलब्ध झाला होता़ त्यांचे अंदाजपत्रकही तयार करण्यात आले. या निधीतून तालुक्यातील अटाळा क्रमांक ३ जोडरस्ता या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, यासाठी ६० लक्ष रुपये खर्च, अतकुर जोड रस्त्यासाठी ८० लक्ष रुपये, हसनाळी जोडरस्त्यासाठी ८० लक्ष रुपये, बामणी थडी ते विळेगाव ८० लक्ष रुपये, रोशनगाव जोडरस्ता ८० लक्ष, पाटोदा जोडरस्ता ८० लक्ष, माष्टी जोडरस्ता ६० लक्ष, जारीकोट ते चोंडी ४० लक्ष, चोळाखा जोडरस्ता ८० लक्ष, चिंचोली जोडरस्ता ८० लक्ष, मंगनाळी जोडरस्ता ८० लक्ष, चोंडी ते चोळाखा ८० लक्ष, जोड रस्ता जुन्नी ४० लक्ष, इतर जिल्हा मार्ग रस्ते पिंपळगाव ते सालेगाव १ , कोटी ६० लक्ष, समराळा ते येताळा ८० लक्ष, निमटेक ते सालेगाव ४० लक्ष आदी कामे करण्यात येणार होती़ मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने एनओसी न देता काम अडकवून ठेवण्यात धन्यता मानली़ परिणामी निधी येवूनही धर्माबाद तालुक्याला त्याचा फायदा झाला नाही़ सरपंच संघटनेने केलेले आंदोलन पाण्यात गेले असे म्हणण्याची वेळ संबंधितांवर आली़ यामागील कारण शोधले असता इतर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे निधी खर्ची झाला नाही अशीही माहिती मिळाली़ आता हा निधी मिळेल की नाही, असा प्रश्न धर्माबादकरांना पडला आहे़ एकूणच या अक्षम्य दिरंगाईला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे़
सरपंच संघटनेने वेधले होते लक्ष
दुर्लक्षित धमार्बाद तालुक्याचा विकास करा किंवा तेलगंणात जाण्याची परवानगी देण्याची मागणी येथील सरपंच संघटनेनी मुख्यमंत्री यांच्याकडे करून शासन व लोकप्रतिनिधींची झोप उडवली होती.
सदरील मागणीची दखल शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेऊन पालकमंत्री रामदास कदम यांना धर्माबाद तालुक्याचा विकास करण्याच्या सूचना दिल्या. यावरून पालकमंत्री रामदास कदम यांनी नांदेड जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रमुखांची १८ जून २०१८ रोजी मंत्रालयात बैठक घेऊन संबधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांकडून माहीती मागविली.
दलगेच जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) सन २०१८-१९ अंतर्गत इतर जिल्हामार्ग व ग्रामीण मार्ग या योजनेअंतर्गत पालकमंत्री यांनी पहिल्या टप्प्यात १२ कोटी ५० लाख रूपयांची निधी पाठविले आहे.