नांदेड : जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी शनिवारी वाई बाजार गटातील जिल्हा परिषद शाळांसह करंजी आरोग्य उपकेंद्राला अचानक भेटी दिल्या. यावेळी तब्बल १२ शिक्षक, विस्तार अधिकाऱ्यासह केंद्रप्रमुखही रजेविनाच गैरहजर असल्याचे आढळून आले. करंजी आरोग्य उपकेंद्रातही असाच प्रकार आढळून आल्याने १८ कर्मचाºयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कर्मचाºयांना आता याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिका-यांसमोर हजर व्हावे लागणार आहे.जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसह आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांबाबत सर्वसामान्य नागरिकांतून वारंवार तक्रारी येतात. या अनुषंगानेच उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गटशिक्षणाधिकाºयांसह इतर कर्मचाºयांना सोबत घेवून वाई बाजार गटातील जिल्हा परिषदेच्या लांजी व वाई बाजार शाळेला अचानक भेट दिल्या. या भेटीवेळी शाळेत विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती. मात्र तब्बल १२ शिक्षकच शाळेत उपस्थित नसल्याचे आढळून आले. याबरोबरच एक विस्तार अधिकारी तसेच एक केंद्रप्रमुखही कर्तव्यावर हजर नव्हता.उपाध्यक्षांनी शाळेला भेट दिल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या कर्मचा-यांची एकच धावपळ उडाली. शिक्षकांचे हजेरीपत्रक मागविले असता त्यावर शिक्षकांच्या रजा नव्हत्या तसेच संबंधित शिक्षक शाळेतही उपस्थित नव्हते. या शाळेची पाहणी केल्यानंतर उपाध्यक्षांचा ताफा करंजी आरोग्य उपकेंद्राकडे वळला. या उपकेंद्रात व पशुसंवर्धन विकास विभागाच्या दवाखान्यातही डॉक्टर गैरहजर असल्याचे आढळून आल्याने उपाध्यक्षाच्या आदेशावरुन दोन्ही कार्यालयांना कुलूप ठोकून सील लावण्यात आले.शनिवार आणि त्यानंतर रविवार असल्याने अनेक कर्मचाºयांनी कार्यालयाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. करंजी उपकेंद्रातील ४ पैकी ३ कर्मचारी व पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी गैरहजर होते. गैरहजर शिक्षकांना गटशिक्षण अधिकाºयांमार्फत कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याने जिल्हा परिषद कर्मचा-यांत खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद शाळेबरोबरच आरोग्य उपकेंद्राबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी असतात. या अनुषंगाने शनिवारी शाळेसह आरोग्य उपकेंद्राला अचानक भेट दिली असता कर्मचारी विनारजा गैरहजर असल्याचे आढळून आले. सदर कर्मचाºयांना नोटीस बजावण्यास सांगण्यात आले असून या कर्मचा-यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे याबाबत स्वत: भेटून खुलासा द्यावयाचा आहे.- समाधान जाधवउपाध्यक्ष, जिल्हा परिषद नांदेड
२९ शिक्षक गेले परीक्षेकरितानांदेड येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी माहूर तालुक्यातून २९ शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकारी गेल्याची माहितीही या भेटीवेळी उघड झाली. हा प्रकार पुढे आल्यानंतर उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी गटशिक्षणाधिकारी मसूद खान यांना याबाबत जाब विचारला. पेसाअंतर्गत क्षेत्रामधून इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांना कार्यमुक्त कसे केले ? अशी विचारणा करीत याबाबतही खुलासा देण्यास सांगण्यात आले आहे.केंद्रप्रमुखांची व्हॉटस्अॅपवर रजा !अचानक भेटीवेळी लांजी जिल्हा परिषद शाळेतील ७ शिक्षक, वडसा येथील २ शिक्षक, असोली येथील दोघे तर वाई बाजारचे केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, आरोग्य उपकेंद्राचे तीन कर्मचारी आणि एक पशुधन विकास अधिकारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, वाईबाजार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे केंद्र प्रमुख व्ही.के.आचणे यांनी गटशिक्षणाधिकाºयांना व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून आपल्या रजेचा अर्ज दिल्याचे सांगितले. दरम्यान, व्हॉटस्अॅपवरुन टाकलेली ही रजा नियमानुसार आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.