- राजेश गंगमवारबिलोली (जि़नांदेड) : एफसीआयमधून निघालेल्या शासकीय धान्याच्या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असून जानेवारी ते जुलै २०१८ या सहा महिन्यांच्या कालावधीत शासकीय धान्याचे तब्बल २०० ट्रक कृष्णूर येथील इंडिया मेगा फूड या खासगी कंपनीत उतरवल्याचे पुरावे बिलोलीच्या जिल्हा सत्र न्यायालयात मंगळवारी सादर करण्यात आले़ व्यवस्थापक जयप्रकाश तापडीया यांच्या अटकपूर्व जामिनासाठी दुसऱ्यांदा केलेल्या अर्जावर न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला़कृष्णूर धान्य घोटाळ््यात सव्वादोन महिन्यांत पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात आला असून आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचे तपास अधिकाºयांनी सांगितले़ व्यवस्थापक तापडीयाचा जामीन यापूर्वीच न्यायालयाने फेटाळला असल्याने पुनर्विचार जामीन अर्ज बिलोली जिल्हा सत्र न्यायालयात दाखल झाला आहे.इंडिया मेगा फॅक्टरीत सापडलेल्या वेगवेगळ्या भुसार ट्रेडींग दुकानदारांची बिले बोगस असून बनावट पावतीद्वारे शासकीय धान्य खरेदीची बिले देण्यात आली़ वास्तविक हे सर्व धान्य शासकीय गोदामातील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे़ जानेवारी ते जुलै दरम्यान मुखेड, देगलूर, बिलोली या तालुक्यांतून १७७ ट्रक हे संबंधित गोदामात पोहोचलेच नाहीत़मुखेड, विजयनगर, कहाळा, देगलूर टोलनाका येथील वाहनांच्या नोंदीमध्ये तफावत आढळली आहे़ यापूर्वीचा वाहतूक ठेकेदार तुकाराम पुरुषोत्तम महाजन (रा़ नांदेड) हे देखील मुख्य आरोपी असून त्यांनी घोटाळा केल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत, असे न्यायालयात सांगण्यात आले़ हिंगोलीचे ठेकेदार खुराणा यांचाही शोध सुरू आहे. सात मुख्य आरोपी फरार आहेत़कृष्णूर शासकीय धान्य घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे़ मागच्या दोन महिन्यांत पोलिसांनी परिश्रम घेऊन तपास पूर्ण केला आहे़ शासकीय वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार व यापूर्वीचे ठेकेदार तुकाराम महाजन यांना ताब्यात घेतल्यावरच काळ्या बाजाराचे धागेदोरे पुढे येतील़-नुरुल हसन,तपास अधिकारी, नांदेड़
सरकारी गोदामांतील २०० ट्रक धान्य खासगी कंपनीत; कृष्णूर धान्य घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 5:44 AM