दिग्रस बंधाऱ्यातील २६ दलघमी पाणी विष्णूपुरीत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:19 AM2021-02-16T04:19:29+5:302021-02-16T04:19:29+5:30

सोमवारी पहाटे २ वाजता नांदेडचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालम येथे उपस्थित झाले. त्यानंतर ...

26 gallons of water from Digras dam enters Vishnupuri | दिग्रस बंधाऱ्यातील २६ दलघमी पाणी विष्णूपुरीत दाखल

दिग्रस बंधाऱ्यातील २६ दलघमी पाणी विष्णूपुरीत दाखल

Next

सोमवारी पहाटे २ वाजता नांदेडचे पाटबंधारे विभागाचे अधिकारी अधीक्षक अभियंता एस.के. सब्बीनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पालम येथे उपस्थित झाले. त्यानंतर गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी पाटील यांच्यासह पालमच्या तहसीलदार प्रतिभा गोरे, पोलीस उपविभागीय अधिकारी सुभाष राठोड, पालमचे पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांच्यासह पोलीस फौजफाटा दिग्रस बंधाऱ्यावर पोहोचला. सकाळी ५.२० वाजता बंधाऱ्यांचे ८ दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. दुपारी १२.२० वाजता गेट बंद करण्यात आले. यावेळी शाखाधिकारी प्रदीप कदम, उपअभियंता राहूल कातकडे, सहायक अभियंता अनिरूध्द कुलकर्णी, वावरे, गुडेवार, विलास देशमुख, बी.एस. गायकवाड, बालाजी शिंदे, राजू तारंगे आदींची उपस्थिती होती.

गेल्या काही वर्षातील लोकांचा विरोध पाहता नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कार्यकारी अभियंता गव्हाणे व शाखाधिकारी कदम यांना अंगरक्षकही देण्यात आले आहेत.

चौकट - विष्णूपुरीत ९७ टक्के जलसाठा

दिग्रस बंधाऱ्यातील २६ दलघमी पाणी उपलब्ध झाल्यानंतर विष्णूपुरी प्रकल्पात एकूण जलसाठा हा ९७ टक्के झाला आहे. प्रकल्पात ७८.४६ दलघमी पाणी शिल्लक आहे. या उपलब्ध जलसाठ्यामुळे नांदेडकरांची तहान भागणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पातून सध्या रबी हंगामासाठी तिसरी व अंतिम पाणीपाळी दिली जात आहे. त्यानंतर संपूर्ण जलसाठा हा नांदेडकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवला जाणार आहे.

Web Title: 26 gallons of water from Digras dam enters Vishnupuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.