पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत ४०६ खेळाडूंचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 12:13 AM2018-11-13T00:13:06+5:302018-11-13T00:13:43+5:30

स्पर्धेला सोमवार, १२ नोव्हेंबरपासून विद्यापीठाच्या इनडोअर स्पोर्ट हॉलमध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेत ५८ विद्यापीठांतील ४०६ खेळाडू सहभागी झाले आहेत़

406 players participate in the Western Divisional Badminton tournament | पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत ४०६ खेळाडूंचा सहभाग

पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत ४०६ खेळाडूंचा सहभाग

Next

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि वसरणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पश्चिम विभागीय बॅडमिंटन (मुले) स्पर्धेला सोमवार, १२ नोव्हेंबरपासून विद्यापीठाच्या इनडोअर स्पोर्ट हॉलमध्ये सुरुवात झाली. या स्पर्धेत ५८ विद्यापीठांतील ४०६ खेळाडू सहभागी झाले आहेत़
सदर स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले आणि गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा अमरजितसिंघजी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी कुलसचिव डॉ.रमजान मुलानी, वसंतराव नाईक महाविद्यालय संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. वसंत भोसले, डॉ. महेश मगर, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. रमाकांत घाडगे, डॉ.अशोक टिपरसे, क्रीडा संचालक डॉ.विठ्ठलसिंह परिहार, स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दीपक बच्चेवार, नगरसेवक श्रीनिवास जाधव उपस्थित होते़ सर्वप्रथम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धव भोसले आणि गुरुद्वारा लंगर साहिबचे संतबाबा अमरजितसिंघजी यांच्या हस्ते स्वारातीम विद्यापीठ आणि आॅल इंडिया युनिव्हर्सीटीचा ध्वज फडकवून स्पर्धेस सुरुवात करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ़ उद्धव भोसले म्हणाले, खेळ हा जीवनाचा अविभाज्य अंग आहे. खेळामुळे आपण शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्त राहतो. आणि खेळामध्ये जर विजय हवा असेल तर कठीण अभ्यासाशिवाय पर्याय नाही़
या स्पर्धेस पंचप्रमुख म्हणून हेमंत खाडिलकर (पुणे), तांत्रिक समितीचे अध्यक्ष डॉ.भास्कर रेड्डी (लातूर), पंच म्हणून प्रदीप सावंत, आदित्य गलांडे (चंद्रपूर), एस. पी. टाकसाळी, भक्ती मोदाळे, नरेश गुंडले (औरंगाबाद), परिक्षीत पाटील, राहुल साळी (धुळे), वैष्णवी मंगरुळकर (परभणी), सचिन बास्ते (जळगाव) हे काम पाहत आहेत.
सूत्रसंचालन अनुराधा पत्की यांनी केले तर स्पर्धा संयोजन समितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दीपक बच्चेवार यांनी आभार मानले. दरम्यान, सदर स्पर्धा पाहण्यासाठी शहर व परिसरातील बॅडमिंटन खेळाडू, क्रीडाप्रेमी नागरिकांनी गर्दी केली होती़

Web Title: 406 players participate in the Western Divisional Badminton tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.