वंचितकडे 5,600 जणांनी दिल्या मुलाखती;20 सप्टेंबरला होणार उमेदवार यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 02:01 PM2019-09-13T14:01:54+5:302019-09-13T14:06:58+5:30

प्राधान्यांनी वंचितांनाच देणार तिकीट

5,600 interviews for Vidhan sabha seats to Vanchit Bahujan Aaghadi; candidate list to be announced on September 20 | वंचितकडे 5,600 जणांनी दिल्या मुलाखती;20 सप्टेंबरला होणार उमेदवार यादी जाहीर

वंचितकडे 5,600 जणांनी दिल्या मुलाखती;20 सप्टेंबरला होणार उमेदवार यादी जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देआप सोबत बोलणी सुरू25 मुस्लिमांना देणार तिकीट

नांदेड : राज्यातील विधानसभेच्या सर्व २८८ जागा वंचित बहुजन आघाडी ताकदीने लढणार आहे़ या जागांसाठी ५ हजार ६९५ जणांनी वंचितकडे मुलाखती दिल्या असून यामध्ये सर्व जाती-धर्मातील उच्च शिक्षितांचा समावेश आहे़ साधारण ७५ टक्के मतदारसंघातील उमेदवारांची नावे अंतिम झाली असून उर्वरित २५ टक्के मतदारसंघातील नावावर चर्चा सुरू आहे़ ती पूर्ण करून येत्या २० सप्टेंबरपूर्वी वंचितची उमेदवार यादी जाहीर करू अशी माहिती पार्लिमेंटरी बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी दिली़

वंचित बहुजन आघाडीची सत्ता संपादन यात्रा शुक्रवारी नांदेडमध्ये होती़ या पार्श्वभूमीवर पाटील यांनी येथील विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला़ मुस्लिम, धनगर, माळी, लिंगायत यांच्यासह ओबीसी प्रवर्गातील अनेक छोट्या जाती वंचितसोबत जोडल्या आहेत़ ओबीसीमध्ये सुमारे ३७० जाती असून त्यांना उमेदवारीमध्ये सामावून घ्यायचे आहे़ अशा स्थितीत एमआयएमने मागणी केलेल्या जागा सोडणे शक्य नव्हते, असे त्यांनी स्पष्ट केले.

 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम समाजातील चार जणांना उमेदवारी दिली होती़ विधानसभा निवडणुकीतही मुस्लिम समाजातील साधारण २५ उमेदवार असतील़ एमआयएमसोबत असतानाही आम्ही मुस्लिम पदाधिकारी कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार होतो आणि एमआयएम नसतानाही आमची तीच भूमिका कायम असल्याचे सांगत एमआयएम सोबत नसली तरी मुस्लिम समाज आजही वंचितसोबत असल्याचा दावा त्यांनी केला़ मुस्लिम समाजाच्या आॅल इंडिया उलेमा बोर्डच्या पदाधिकाºयांनी कालच नांदेडमध्ये माझ्याशीही चर्चा केली असून या बोर्डचा वंचितला पाठिंबा आहे़ विधानसभा निवडणुकीत ते वंचितसोबत सक्रीय राहणार असल्याचे अण्णाराव पाटील यांनी सांगितले़ अठरा पगड जातीतील वंचितांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे अ‍ॅड़प्रकाश आंबेडकर यांचे धोरण असून वंचित जातींचाच सन्मान करणारे नेते म्हणून महाराष्ट्रातील जनता त्यांच्या पाठीशी राहील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

आप पक्षाबरोबर वंचित आघाडीची बोलणी सुरू असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली़ यावेळी राम गारकर, पक्षाचे प्रवक्ते फारूख अहमद, जिल्हाध्यक्ष डॉक़ुºहे, प्रशांत इंगोले, रामचंद्र येईलवाड आदींची उपस्थिती होती़

Web Title: 5,600 interviews for Vidhan sabha seats to Vanchit Bahujan Aaghadi; candidate list to be announced on September 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.