आरा मशिनला आग लागून लाखोंचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 12:33 AM2019-02-27T00:33:26+5:302019-02-27T00:33:59+5:30
येथून १२ किलोमीटरवरील कर्नाटकाच्या चोंडीमुखेड येथील आराम मशीनला मंगळवारी पहाटे आग लागून अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले़ उदगीर येथील अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली़ पण तोपर्यंत सर्व लाकूड व आरामशीन जळून खाक झाली़
मुक्रमाबाद : येथून १२ किलोमीटरवरील कर्नाटकाच्या चोंडीमुखेड येथील आराम मशीनला मंगळवारी पहाटे आग लागून अंदाजे पाच लाख रुपयाचे नुकसान झाले़ उदगीर येथील अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर आग आटोक्यात आली़ पण तोपर्यंत सर्व लाकूड व आरामशीन जळून खाक झाली़
या प्रकरणाची कुठेही नोंद नाही़ चोंडी मुखेड गाव कर्नाटकातील होकर्णा तालुका औराद वीदर या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येते़ होकर्णा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवकुमार यांच्याशी संपर्क केला असता, या घटनेची पोलीस स्टेशनला कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही़ हळणी बाराळीचे वन शिलेदार केरबा पितलवाड यांनी चोंडी मुखेड येथील जळालेल्या आराम मशीनला भेट दिली़
चोंडी-मुखेड गाव कर्नाटकातील चिखली ग्रुप ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट आहे़ चिखली ग्रुप ग्रामपंचायतमध्ये चिखली, मुदखेड, बिजलगाव, चोंडी मुखेड अशा ४ गावाची १९ सदस्याची ग्रुप ग्रामपंचायत आहे़ या चिखली गावाला किंवा कर्नाटकच्या हद्दीत जाण्यासाठी चोंडी मुखेड वासियांना दहा किलो मीटरची महाराष्ट्राची हद्द पार पाडावी लागते़या कर्नाटक राज्याच्या चोंडी मुखेड या गावाच्या हद्दीत एकूण ४ आरा मशीन अनाधिकृतपणे चालतात़