पैनगंगा काठावरील गावांना अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:22 AM2021-09-14T04:22:39+5:302021-09-14T04:22:39+5:30
या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जयपूर बंधाऱ्यामधून ५४.६६ क्यूमेक्स इतका विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे जलाशय पाणीपातळीत वाढ ...
या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील जयपूर बंधाऱ्यामधून ५४.६६ क्यूमेक्स इतका विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे जलाशय पाणीपातळीत वाढ होत आहे. पाण्याची आवक पाहता इसापूर धरणाचे दोन दरवाजे सोमवारी दुपारी उघडण्यात आले असून. नदीपात्रात १३७४ क्यूसेक इतका विसर्ग सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे लक्षात घेऊन व संभाव्य पुराच्या पाण्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये यादृष्टीने पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तिरावरील गावातील नागरिकांनी आपली जनावरे, घरगुती व शेतोपयोगी सामान सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्याचे आवाहन ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता अ. बा. जाधव यांनी केले आहे.