आजपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू; मुलांचे ऑनलाईन, गृहभेटीच्या माध्यमातून शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:24 AM2021-06-16T04:24:58+5:302021-06-16T04:24:58+5:30
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या-त्या इयत्तांची पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील याबाबतीत नियोजन करावे व त्यांचे ऑनलाईन माध्यमातून, तसेच गृहभेटीच्या माध्यमातून स्वाध्याय व ...
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या-त्या इयत्तांची पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील याबाबतीत नियोजन करावे व त्यांचे ऑनलाईन माध्यमातून, तसेच गृहभेटीच्या माध्यमातून स्वाध्याय व उपक्रमाद्वारे शिक्षण सुरू ठेवावेत. तसेच दूरदर्शनच्या माध्यमातून सर्व वर्गांच्या अध्यापनासाठीचे वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. त्यानुसार विद्यार्थी हे कार्यक्रम पाहतील व अभ्यासक्रम पूर्ण करतील यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत.
माझी शाळा, सुंदर शाळा, वृक्षारोपण यासह शालेय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या त्या विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त होईल, याची दक्षता शिक्षकांनी घ्यावयाची आहे. तसेच गोष्टींचा शनिवार या उपक्रमातून वाचनासाठी विद्यार्थ्यांना एक तास वाचनकट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून वाचन संस्कृती जोपासण्याचे काम या काळात शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी गावपातळीवर शिक्षक मित्र व पालकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी दिल्या आहेत.
चौकट...
नांदेड जिल्ह्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या एकूण ३ हजार ७३१ शाळा आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जाणाऱ्या २ हजार १९८ शाळा आहेत. या शाळांमधून शिक्षण देणारे २४ हजार ४६८ शिक्षक, तर ६ लाख ९५ हजार १२१ विद्यार्थी आहेत. यात जिल्हा परिषदेचे ९ हजार २२३ शिक्षक, तर २ लाख ६ हजार १७९ विद्यार्थी आहेत.