शरद वाघमारे।मालेगाव : अंगणवाडी सेवामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने अंगणवाडीसेविका यांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन दिले असून, आता प्रत्यक्ष देखरेख प्रणालीतून अंगणवाडीतील सर्व्हे होणार आहे.अर्धापूर तालुक्यातील १३८ अंगणवाडीसेविका यांना स्मार्ट फोनचे वाटप करण्यात आले आहे. अंगणवाडीतून ज्या सेवा पुरविल्या जातात, त्याबाबतचे प्रशिक्षण लहान (ता.अर्धापूर) येथे देण्यात येत आहे. या प्रशिक्षणात गटसमन्वयक प्रशिक्षण देत आहेत. पूर्वी अंगणवाडीसेविका यांना रजिस्टरमध्ये माहिती लिहून ती प्रकल्प कार्यालयात सादर करावी लागत असे, हे काम खूप जिकिरीचे होते. आता अंगणवाडीसेविका मोबाईलद्वारे पोषण आहार स्थिती, कुटुंब व्यवस्थापन, दैनिक आहार, गृहभेट नियोजन, वाढ देखरेख, शिधावाटप नोंद, अंगणवाडी केंद्र व्यवस्थापन, मासिक प्रगती अहवाल याबाबतची सर्व माहिती आर. टी.एम. प्रत्यक्ष देखरेख प्रणालीद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. स्मार्ट मोबाईलमध्ये कॉमन अप्लिकेशन सॉफ्टवेयर असून यातून आयसीडीएस-सीएएस सर्व उद्दिष्ट पूर्ण होणार आहे.बालविकास प्रकल्प अधिकारी सुप्रिया पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी शिवाजी जामूदे, सुपरवायझर, एस. जे. कांबळे, रेणू देशपांडे, तालुका गटसमन्वयक राहुल वाघमारे, मुख्य प्रशिक्षक मीना भोरगे, अरुणा पतंगे, विजया स्वामी, सुरेखा तेलंग, अंगणवाडीसेविका यांना मोबाईल प्रशिक्षण देत आहेत.
अंगणवाडीताई होणार आता ‘स्मार्ट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 12:41 AM
अंगणवाडी सेवामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने अंगणवाडीसेविका यांना तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्मार्टफोन दिले असून, आता प्रत्यक्ष देखरेख प्रणालीतून अंगणवाडीतील सर्व्हे होणार आहे.
ठळक मुद्देअर्धापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण