स्थायी समितीच्या सभेत १४ विषयांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:16+5:302021-05-23T04:17:16+5:30
स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात झालेल्या सभेला आयुक्त डॉ.सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, ...
स्थायी समितीचे सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभागृहात झालेल्या सभेला आयुक्त डॉ.सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त बाबासाहेब मनोहरे, प्रभारी नगरसचिव अजितपालसिंह संधू, नगरसेवक अमितसिंह तेहरा, बालाजी जाधव तसेच इतर सदस्य, अधिकारी हे ऑनलाईन उपस्थित हाते. नांदेड शहरातील भक्ती लॉन्स, फातेमा हायस्कूल कोविड सेंटर, हैदरबाग दवाखाना, महूसल भवन कोविड सेंटर, पंजाब भवन, एनआरआय यात्री निवास कोविड सेंटर येथे साफसफाईसाठी लागणाऱ्या सफाई कामगारांसाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यासाठी वाल्मिकी मेहतर समाजसुधार बहुउदेशीय सेवाभावी संस्था , छत्रपती शिवाजी स्वयंरोजगार संस्था यांचे प्रस्ताव आले होते. तसेच कोविड सेंटरसाठी कॉट व गाद्या खरेदीसाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठै नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत जनता कॉलनी येथे समाजमंदिराचे बांधकाम करणे, गोवर्धन टेकडी बौद्ध विहारालगतचा रस्ता तयार करण्यास मंजुरी देण्यात आली. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत जनता कॉलनी येथे समाजमंदिराचे बांधकाम करणे, गोवर्धन टेकडी बौद्ध विहारालगतचा रस्ता तयार करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर रुग्णालय येथै अद्ययावत सुविधा व उपकरणे पुरवण्याच्या कामासाठी खरेदी करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. शासकीय आयुर्वेद महाविद्यालय येथे कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने आणि औषधी वनस्पती उद्यानासाठी लागणाऱ्या पाणीनिर्मितीासाठी विकेंद्रीत मलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी मान्यता देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत शनीघाट व सावित्रीबाई फुले शाळेजवळ विकेंद्रीत मलशुद्धीकरण प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
पाणीपुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्रावर ब्लिचिंग पावडर पुरवठा करण्याबाबत तसेच सर्व जलशुद्धीकरण केंद्राचे क्लोरीफायर दुरुस्तीबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसेच ब्रम्हपूरी भागातील बीएसयुपी योजनेअंतर्गत मलनिस्सारण व्यवस्थेतील उर्वरित काम पूर्ण करण्याबाबतचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.