नितेश बनसोडे।श्रीक्षेत्र माहूर : भाविकांच्या सुविधेसाठी केंद्र सरकारच्या निधीतून साडेआठ कोटी रुपये खर्च करून माहूर तीर्थक्षेत्रावर उभारलेले पर्यटनयात्री संकुल पाच वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. उद्घाटनाअभावी ही देखणी इमारत बाभूळबनात अडकली असून, इमारतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे. दुसरीकडे, मोकाट गुराढोरांचा येथे वावर वाढला असून अवैध व्यावसायिकसुद्धा या केंद्रावरून ‘रात्रीस खेळ चाले’ चा प्रयोग अवलंबत असल्याची चर्चा आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी शिखर संस्थानची साडेआठ एकर जमीन हस्तगत करून केंद्र सरकारच्या निधीतून पर्यटन संकुलाची भव्य वास्तू उभारली गेली. मातृतीर्थ परिसराकडे जाणाऱ्या निसर्गरम्य जागेत सदरील पर्यटक निवास बांधले आहे. या ठिकाणी अद्ययावत मिनी बसस्थानक, भव्य वाहनतळ, सुसज्ज उपाहारगृह, भव्य दरबार हॉल व यात्रीनिवास बांधण्यात आले आहे. मात्र लोकार्पणाअभावी हा कोट्यवधीचा निधी वाया जात असल्याचे दिसून येते.शहरातील काही मंदिर विश्वस्तांच्या स्वत:च्या मालकीचे खासगी लॉज तसेच यात्रीनिवास आहेत. यात्राकाळात माहूरला भाविकांची मोठी गर्दी होते़ यावेळी निवासासाठी थांबणाऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी वारंवार येत असतानाही सरकारी निधीतून उभारलेले हे निवास सुरु करण्यात प्रशासन का टाळाटाळ त आहे? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. साडेआठ कोटींच्या पर्यटनयात्री संकुलाचे पालकत्व स्वीकारून भाविकांना सोय उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे़पाचोंद्याचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समोवश व्हावामौजे पाचोंदा हे पुरातन तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्राचा रामायणातसुद्धा उल्लेख आहे. मात्र त्यानंतरही प्रचार-प्रसाराअभावी हे तीर्थक्षेत्र विकासापासून कोसोदूर आहे. माहूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणात या तीर्थक्षेत्राचा समावेश करून विकास केल्यास निसर्गरम्य वनराईने नटलेला हा परिसर तीर्थक्षेत्राबरोबरच पर्यटनस्थळ म्हणूनसुद्धा नावारूपास येऊ शकतो. येथील तीर्थक्षेत्र हे उनकेश्वर ता.किनवट येथील शाखेची उपशाखा असून प्रभू श्री रामचंद्र माहूर येथील अनसूया मातेच्या दर्शनाला आले असता ते पाचोंदा या तीर्थक्षेत्रावरसुद्धा आल्याचा इतिहासात उल्लेख आहे. या क्षेत्राचे नाव पांचाळेश्वर असे होते. तेव्हापासून या तीर्थक्षेत्रावर प्रभू श्री रामाचे मंदिर आहे. ज्यांना हा इतिहास माहीत आहे. ते माहूरगडावर आल्यानंतर पाचोंदा येथे येतात. माहूर तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणअंतर्गत विकास आराखड्यत समावेश असलेले वझरा (शे.फ.) या गावापासून हे क्षेत्र केवळ ४ कि.मी अंतरावर आहे़ हे तीर्थक्षेत्र निसर्गरम्य वनराईने नटलेले असून या तलावाचा विकास झाल्यास इको टुरिझम येथे यशस्वी होऊ शकते.त्यासाठी प्रशासनाने या पुरातन तीर्थक्षेत्राच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
शासनाने द्यावे लक्षपाचोंदा हे क्षेत्र अतिदुर्गम जंगल भागात असल्याने वनविभागामार्फत विकास करता येईल यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांना भेटून विकास योजनेतून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - अॅड़ रमण जायभायेपाचोंदा तीर्थक्षेत्र उनकेश्वर ता.किनवटची उपशाखा असून उनकेश्वरला येणारे भाविक पाचोंदा येथे हमखास येतात़ या तीर्थ्२ाक्षेत्राचा विकास करुन या तीर्थक्षेत्राला जुने वैभव मिळवून देण्याची गरज आहे़ यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा़- गौतम महामुने, उपसरपंच, पाचोंदा