आयुर्वेदिक उपचार आरोग्य शिबिराचे रविवारी आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:17 AM2021-01-23T04:17:56+5:302021-01-23T04:17:56+5:30
यावेळी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नांदेडचे अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एस. जी. कदम, निमा आरोग्य ...
यावेळी शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नांदेडचे अधिष्ठाता डॉ. वाय. आर. पाटील, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एस. जी. कदम, निमा आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. ए. एन. वडजे, प्रसिद्ध वैद्यकीयतज्ज्ञ डॉ. शेख रफिक अहेमद, पी.एस.के. होमिओपॅथिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील, डॉ. एम. जे. कादरी, शादुल्ला खान, सनउल्ला कादरी, नुरूल्ला कादरी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात गॅगरिंग, त्वचाविकार, अॅलर्जी, सांधेविकार, दमादोष, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कर्करोग, मूळव्याध, मधुमेह, स्त्रियांच्या विविध समस्या, पचनविकार, शरीरातील रक्तपेशी कमी होणे, मानसिक आजार, रोगप्रतिकारशक्ती वाढवणेे, इत्यादी विविध आजारांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
इच्छुक गरजूंनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. एम. जे. कादरी, अफिफा बेगम, मरियम, कशिफा सुल्ताना, डॉ. निलोफर अफरीन, असेफा सुल्ताना यांनी केले आहे.