नांदेड : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यात सहा टप्प्यात ४ लाख ४५ हजार ५८४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. मात्र अनेक करदात्या शेतकरी व अपात्र असलेल्या शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेतला आहे. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्यातील ९ हजार ९८५ शेतकऱ्यांकडून रक्कम परत घेतली जाणार आहे. आतापर्यंत १८ हजार रुपये वसुलीही जिल्ह्यात पूर्ण झाली आहे.
या योजनेचा लाभ धनदांडग्यांनीही घेतल्याची बाब इतर राज्यात उघडकीस आल्यानंतर तपासणी करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यात कर दाते असलेले ६ हजार ६१८ तर अपात्र असलेल्या ३ हजार ३७६ लाभाथ्यार्ंनी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेचा लाभ घेतल्याची बाब स्पष्ट झाली आहे. ही रक्कम आता वसूल करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे.
अपुऱ्या कागदपत्रामुळे शेतकरी अपात्र जिल्ह्यात सदर योजनेअंतर्गत ४ लाख ५ हजार ५८४ पात्र ठरले तर ३ हजार ३७६ शेतकरी अपात्र ठरले आहेत.तपासणीमध्ये करदाते शेतकऱ्यांसह सदर योजनेत कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अपात्र ठरले आहेत. शेती नसतानाही सदर योजनेसाठी अर्ज भरल्याच्या बाबीही पुढे आल्या
साडेसहा हजार करदात्यांनीही घेतला लाभजिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ६ हजार ६१३ जणांनी करदाते असूनही लाभ घेतल्याची बाब पुढे आली आहे. यामध्ये सर्वाधिक शेतकरी हे मुखेड तालुक्यातील आहेत.
रकमेची वसुली सुरूजिल्ह्यात अपात्र असलेल्या लाभाथ्यांनाही रक्कम वाटप झाल्यानंतर ती वसुली सुरू झाली आहे. या वसुलीसाठी मोहीमच हाती घेतली जाणार आहे.