दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:29+5:302021-02-05T06:08:29+5:30
रामतीर्थ येथे महिलेचा छळ बिलोली : चारित्र्यावर संशय घेऊन महिलेचा छळ करणाऱ्या आरोपींविरुद्ध रामतीर्थ पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तुला स्वयंपाक ...
रामतीर्थ येथे महिलेचा छळ
बिलोली : चारित्र्यावर संशय घेऊन महिलेचा छळ करणाऱ्या आरोपींविरुद्ध रामतीर्थ पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तुला स्वयंपाक येत नाही, तू आमच्या मनाप्रमाणे वागत नाही, माहेराहून ५० हजार रुपये घेऊन ये असे म्हणून सासरी छळ होत असल्याची तक्रार विवाहितेने रामतीर्थ पोलिसात केली. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला.
वन विभागातर्फे रक्तदान शिबिर
नांदेड : येथील उपवनसंरक्षक कार्यालयाच्या प्रांगणात रक्तदान शिबिर घेण्यात आले. राज्य वनरक्षक व प्रबंधक वनपाल संघटनेच्या वतीने हे शिबीर पार पडले. उद्घाटन उपवनसंरक्षक आर.ए. सातेलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अधिकारी डी.एस. पवार, एस.जी. कवळे, रासणे उपस्थित होते. यात २१९ जणांनी रक्तदान केले.
अध्यक्षपदी समद कुरेशी
भोकर : भोकर कुरेशी समाजातील नागरिकांच्या बैठकीत संघटनेच्या अध्यक्षपदी समद कुरेशी व सचिवपदी हबीब कुरेशी यांची निवड झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष हाजी कुरेशी, अल्ताफ कुरेशी, हबीब कुरेशी, रमजान कुरेशी उपस्थित होते. भोकर तालुका उपाध्यक्ष म. इलियास सहाब कुरेशी, सचिव मो. हाशीम साब कुरेशी, सहसचिव म. इकबाल साहब कुरेशी, कोषाध्यक्ष म.जावेद साहब कुरेशी यांची निवड झाली.
अवैध दारू विक्री
हदगाव : तालुक्यातील रावणगाव येथील महिला गावातील अवैध दारू विक्रीविरुद्ध आक्रमक झाल्या. त्यांनी तामसा पोलीस ठाण्यात निवेदन दिले. यावेळी ललिता ढोले, अर्चना ढोले, पंचशीला ढोले, शीला ढोले, कमल भालेराव, रमा ढोले, दीपाली ढोले, निर्मला भालेराव, शोभा ढोले, लक्ष्मीबाई ढोले, रंजना ढोले आदी उपस्थित होत्या.
चिकाळा शाळा बंद
हदगाव : तालुक्यातील चिकाळा येथे एक शिक्षिका कोरोना बाधित निष्पन्न झाल्याने शाळा सुरू होणे लांबणीवर पडले आहे. शिक्षिका प्रजासत्ताक दिनाला उपस्थित होत्या. दुपारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बुधवारी दुपारी पाचवी ते आठवी वर्ग चालू करण्याच्या सूचना होत्या; पण बाधित शिक्षिकेमुळे शाळा बंद ठेवण्यात आली.
कालव्याचे काम निकृष्ट
मुखेड : तालुक्यातील कुंद्राळा मध्यम प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असून, कामाची चौकशी करण्याची मागणी पाणी वापर संस्थांनी कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे. निवेदनावर धोंडिबा अस्वले, जगन्नाथ तरगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
भोकरला प्रजासत्ताक दिन
भोकर : शहरातील नवी आबादी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक बिराजदार यांनी ध्वजारोहण केले. यावेळी राजू दांडगे, हंबर्डे, सोनकांबळे, देबडवार, सूर्यवंशी, सावंत, खोगरे, मुडपे उपस्थित होते.
पोलीस ठाण्याची मागणी
माहूर : तालुक्यातील वाईबाजार येथे पोलीस ठाणे मंजूर करावे, अशी मागणी जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष नामदेवराव केशवे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. वाईबाजार येथे यापूर्वी पोलीस चौकी होती. मात्र आजघडीला ती सुद्धा नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
किनवटला ध्वजारोहण
किनवट : प्रजासत्ताक दिनानिमित्त किनवट येथे सहायक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पूजार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आ. भीमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, तहसीलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे आदी उपस्थित होते.