कंधार, किनवटमध्ये दुचाकी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:20+5:302021-06-20T04:14:20+5:30
लोहा तालुक्यातील कापसी बु. येथे ट्रॅक्टरच्या धडकेने दोन शेतकरी विहिरीत पडले होते. त्यातील एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ...
लोहा तालुक्यातील कापसी बु. येथे ट्रॅक्टरच्या धडकेने दोन शेतकरी विहिरीत पडले होते. त्यातील एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना १५ जून रोजी घडली होती.
शिवराज भगवान कापसे आणि अवधूत ढेपे हे दोघे जण शेतात काम करीत होते. त्याचवेळी मन्मथ माधवराव कापसे हा शेतात ट्रॅक्टर घेऊन आला. यावेळी त्याने भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवित शिवराज कापसे आणि अवधूत यांना धडक दिली. या धडकेने दोघेही जण विहिरीत पडले. यावेळी जबर दुखापत झाल्याने दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यात शिवराज कापसे यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात गणेश कापसे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला.
बहीण नांदायला येत नसल्याने मेव्हणीला मारहाण
नांदेड : बहीण नांदायला येत नसल्याने मेव्हणी आणि तिच्या मैत्रिणीचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. ही घटना २७ मे रोजी घडली होती. या प्रकरणात शुक्रवारी रात्री नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सोनाली ज्ञानेश्वर चव्हाण ही महिला मैत्रीण रावजींदर कौर हिच्यासोबत नानकसर गुरुद्वारा जात असताना रवीनगर भागात त्यांची दुचाकी अडविण्यात आली. यावेळी धमकावून त्यांना जीपमध्ये बसवून परभणी जिल्ह्यातील ताडपांगरी शिवारात नेण्यात आले. या ठिकाणी सोनाली चव्हाण आणि रावजींदर कौर यांना धमकावून मारहाण करण्यात आली.
एक लाखासाठी विवाहितेचा छळ
मूलबाळ होत नसल्याने ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेराहून १ लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणात माहूर पोलीस ठाण्यात सुरेश वाघमारे, सुजाता वाघमारे, लखन वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शेतकरी कुटुंबाला जबर मारहाण
अर्धापूर तालुक्यातील मेंढला शिवारात पेरणी केलेल्या शेतातून बैल नेण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर लिंबाजी मारोती वानखेडे यांना मारहाण करण्यात आली. मध्यस्थी करीत असलेल्या त्यांच्या पत्नी आणि मुलालाही आरोपींनी धक्काबुक्की केली. या प्रकरणात अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
भावाला बिघडविले म्हणून डोके फोडले
भाेकर तालुक्यातील नाईकनगर तांडा येथे भावाला दारुचे व्यसन लावून बिघडविल्याचा आरोप करीत दगड मारून डोके फोडण्यात आले. तसेच काठीने हाता-पायावर मारहाण केली. या प्रकरणात बाबूलाल राठोड यांनी भोकर ठाण्यात तक्रार दिली.