बिलोली : राज्यात १ जुलैला ३३ कोटी वृक्षलागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी वनविभागाने आधीच रोपांची निर्मिती करुन रोपवाटिका फुलविली आहे.बिलोली तालुक्यातील बडूर येथील रोपवाटिकेत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवानंद कोळी, वनपाल मोहम्मद शेख, वनरक्षक गिरीष कुरुडे, वनमजूर लक्ष्मण इबितवार, शेख पाशामियाँ, रोपवाटिका देखरेख करणारे ग्रामरोजगार सेवक प्रकाश दुगाणे यांच्या परिश्रमातून बडूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत १ लाख ४५ हजारांहून अधिक रोपे फुलली आहेत.बामणी वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या बडूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत वनविभागाकडून १ लाख ४५ हजारांहून अधिक रोपांचे संवर्धन केले आहे.यामध्ये १५ वेगवेगळ्या जातीचे रोपे असून सागवान, करंज, सीताफळ, कडूलिंब, रिठा, बिडा, चिंच, आवळा, बोर, बांबू यासह काही फळझाडेही आहेत. संपूर्ण रोपवाटिका हिरव्यागार रोपांनी नटली असून १ जुलैला राज्यात होणाºया ऐतिहासिक वृक्षलागवड उपक्रमात ही रोपे परिसरातील ग्रामपंचायतींना, वनकन्या समृद्धी योजना, रानमाळा व विविध योजनेअंतर्गत अनेक भागात लागवडीसाठी दिली जाणार असल्याची माहिती वनरक्षक गिरीष कुरुडे यांनी दिलीे.रोपवाटिकेतील रोपांना जगविण्यासाठी भूमिगत पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था केली आहे़मजूर व वनरक्षक गिरीष कुरुडे, वनपाल मोहम्मद शेख यांच्या परिश्रमातून फुललेल्या रोपवाटिकेतील रोपे १ जुलैला बिलोली तालुक्यातील विविध भागात लावली जाणार आहेत.कडक उन्हातही रोपे हिरवीगारबडूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेतील रोपांना वनविभागांकडून पाणी, नैसर्गिक खत आदींसह वनस्पती वाढीसाठी लागणारी औषधीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.त्यामुळे भर उन्हातही रोपे हिरवीगार दिसून येत आहेत.बामणी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाºया बडूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिकेत वनविभागाकडून १ लाख ४५ हजारांहून अधिक रोपांचे संवर्धन केले आहे. यामध्ये वेगवेगळ्या १५ जातींची रोपे आहेत़
बिलोली वन विभागाने वाढविली दीड लाख रोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:13 AM
राज्यात १ जुलैला ३३ कोटी वृक्षलागवडीला प्रारंभ होणार आहे. या मोहिमेत लाखो रोपांची आवश्यकता असणार आहे. त्यासाठी वनविभागाने आधीच रोपांची निर्मिती करुन रोपवाटिका फुलविली आहे.
ठळक मुद्दे३३ कोटी वृक्षलागवडीचा शासनाचा उपक्रम वृक्षारोपणासाठी बडूर येथील रोपवाटिका रोपांनी फुलली