हिमायतनगर : तालुक्यातील सरसम येथील मातंग समाजाच्या दोन्हींकडील कुटंबांचा विवाहसोहळा वेगळ्या अर्थाने चर्चेत आला आहे़ लग्नात आप्तेष्ट आणि नातेवाईकांना अहेर व वस्तू भेट देण्याऐवजी महापुरुषांची पुस्तके देऊन समाजात आगळावेगळा उपक्रम राबविला आहे़ या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे़सरसम येथील पार्वतीबाई संभाजी गणपत बनसोडे यांचे तृतीय चिरंजीव राजेश व अरुणा गंगाधर दांडेकर यांची ज्येष्ठ कन्या आरती यांचा विवाहसोहळा २७ मे रोजी पार पडला़ हा विवाह सोहळा सत्यशोधक विवाह पद्धतीने लावण्यात आला़ सत्यशोधक पद्धतीत मंगलअष्टकाऐवजी महापुरुषांच्या विचारगाथा माँ जिजाऊ, सावित्रीबाई, फुले, शाहू, आंबेडकर, गाडगेबाबा आदी महामानवांच्या विचारधारेतील मार्गाचा अनुरोध करुन नवरी व नवरदेव यांना प्रार्थना देऊन विवाह लावण्यात आला. यावेळी अक्षदाऐवजी पुष्पवृष्टी करण्यात आली.हा विवाह सत्यशोधक समाज महासभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष के. एम. वाघमारे, समाजसेवक एम. आर. नकेवार यांच्या हस्ते झाला. बनसोडे परिवार सुशिक्षित असल्याने अगोदर दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या एका मुलाचा विवाह बौद्ध पद्धतीने लावून समाजात वेगळा आदर्श निर्माण केला होता़समाजातील अनेक नागरिक होते उपस्थितविवाहप्रसंगी कै.देशमुख विद्यालयाचे अध्यक्ष श्यामराव देशमुख, मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, लोकडे, गोविंद गोखले, परमेश्वर गोपतवाड, बापूराव आडे, सुनील गोखले, सुभाष दारवंडे, सोपान बोंपिलवार, डाके, दत्ता शिराने, गंगाधर वाघमारे व सर्वच समाजातील नागरिक, पत्रकार, शिक्षकवृंद व कर्मचारी उपस्थित होते.व-हाडींनीही नवदांम्पत्याला दिली पुस्तके भेटलग्नापूर्वीच सर्व पाहुणेमंडळी आणि व-हाडींना या उपक्रमाची कल्पना देण्यात आली होती़ त्यामुळे बहुतांश वºहाडी मंडळींनीही दाम्पत्याला भेट देण्यासाठी पुस्तके आणली होती़ त्यामध्ये देशातील महापुरुषांचे आत्मचरित्र, त्यांचा जीवनप्रवास यांचा समावेश असलेली पुस्तके अधिक होती़ त्यानंतर ही पुस्तके नातेवाईकांना अहेर म्हणून देण्यात आली़ या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याचे परिसरात कौतुक होत असून अशाचप्रकारे सोहळे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़