रस्ता, स्मशानभूमीसाठी मतदानावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:36 AM2019-03-11T00:36:59+5:302019-03-11T00:40:01+5:30

हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या वाळकेवाडी-दूधड ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या धनवेवाडी-वडाचीवाडी, बुरुकुलवाडी येथील नागरिकांनी रस्ता मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार ठाम असल्याचे सांगितले, त्यामुळे तहसीलदारांच्या शिष्टमंडळाला परत फिरावे लागले.

Boycott voting for road, crematorium | रस्ता, स्मशानभूमीसाठी मतदानावर बहिष्कार

रस्ता, स्मशानभूमीसाठी मतदानावर बहिष्कार

Next
ठळक मुद्देहिमायतनगर, श्रीक्षेत्र माहूर, धर्माबाद तालुक्यांतील समस्या वाळकेवाडी - दुधड गटग्रामपंचायतीमधील गावे बहिष्कारावर ठाम

हिमायतनगर : हिमायतनगर तालुक्यात येणाऱ्या वाळकेवाडी-दूधड ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या धनवेवाडी-वडाचीवाडी, बुरुकुलवाडी येथील नागरिकांनी रस्ता मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार ठाम असल्याचे सांगितले, त्यामुळे तहसीलदारांच्या शिष्टमंडळाला परत फिरावे लागले.
तालुक्यातील दुर्गम डोंगर पायथ्याशी बसलेले आदिवासी बहुलगाव वाळकेवाडी-दूधड गटग्रामपंचायतमध्ये येणारे धनवेवाडी, वडाचीवाडी, बुरकुलवाडीला जाण्यासाठी रस्ता नाही़ आरोग्य, विजेसह अनेक सुविधांचा अभाव आहे. रस्ता नसल्याने येथील आदिवासी लोकांना पावसाळ्यात मरणयातना सोसाव्या लागतात़ रस्त्यासाठी येथील नागरिकांनी मागील चार वर्षांपासून संबंधितांना निवेदन देऊन मागणी केली होती़
किनवट-नांदेड महामार्गावरील सोनारी फाटा येथे रास्ता रोको केला होता़ त्यावेळी केवळ आश्वासनच मिळाले़ रस्त्यासाठी गावकऱ्यांनी शासनदरबारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता उत्तर विभाग बांधकाम जि़प.नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड, मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, पालकमंत्री, आमदार, उपवनसंरक्षण विभाग नांदेड यांच्याकडे पाठपुरावा करुन उपयोग झाला नाही़ त्यामुळे येणाºया लोकसभा, विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदन जिल्हाधिकाºयांना गावकºयांच्या वतीने देण्यात आले होते़
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ७ मार्च रोजी शासनाच्या वतीने हिमायतनगरचे तहसीलदार जाधव व शिष्टमंडळ यानी सर्व गावकºयांसोबत जवळपास चार तास चर्चा केली़ मात्र गावकºयांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला नाही़ आधी आम्हाला रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन द्या, काम सुरु करा नंतरच बहिष्कार मागे घेणार असल्याचे सांगितले़ त्यामुळे तहसीलदार यांच्या शिष्टमंडळाला मागे परतावे लागले
स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न रखडला
श्रीक्षेत्र माहूर : मागील अनेक दिवसांपासून रेंगाळत पडलेल्या माहूर तालुक्यातील लिंबायत-नेर ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीच्या जागेसाठी प्रशासनाने युद्धपातळीवर तोडगा न काढल्यास लोकसभा निवडणुकीवर संपूर्ण मतदारांसह बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे लिंबायत येथील सरपंच रंजना सुभाष दवणे यांनी दिला आहे़ यासंदर्भात माहूर येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़
लिंबायत-नेर येथील स्मशानभूमीच्या जागेचा प्रश्न मागील कित्येक वर्षांपासून अनेक निवेदने,आंदोलने करूनही सुटला नसल्याने प्रशासनाच्या कारभाराप्रति सर्व मतदारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. स्मशानभूमीच्या जागेसाठी गावकºयांनी २०१९ च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे ठरविले आहे. गावकºयांच्या वतीने महिला सरपंच दवणे यांनी दिलेल्या लक्षवेधी निवेदनात स्मशानभूमीच्या जागेचे प्रश्न निवडणुकीपूर्वी निकाली काढावे, अशी मागणी, सुद्धा केली आहे़ या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, उपजिल्हाधिकारी किनवट यांना देण्यात आले आहे. लिंबायत- नेर गटग्रामपंचायतमधील मतदारांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली असून या समस्येवर निवडणुकीपूर्वी तोडगा निघेल किंवा नाही हे येणाºया काळात समजणार आहे.


महसूल प्रशासनाने लिंबायत गावास स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास तातडीने शेड व इतर आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येईल - समाधान जाधव, जि.प.उपाध्यक्ष नांदेड

अंदाजे अकराशे लोकसंख्या व साडेसहाशे इतके मतदार असलेल्या मौजे लिंबायत नेर गावाचे १९८३ मध्ये पुनर्वसन झाले.तेव्हापासून आजपर्यंत इथे जीवनावश्यक सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. तर मेल्यानंतरच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने मरणोपरांत मृतदेहाची विटंबना होते. पुनर्वसन विभागाचे अध्यक्ष माधव भंडारी यांच्यासह सह सर्वच घटकांना या समस्येशी अवगत केले आहेत. प्रसंगी मृतदेह तहसील कार्यालयाला घेऊन जाण्याचेही अनेकदा ठरले. परंतु, तालुक्यातील जुन्या जाणकारांनी त्यापासून परावृत्त केले. आता मात्र समस्त ग्रामस्थ स्मशानभूमीच्या जागेसाठी पेटून उठले असून जिल्हाधिकाºयांनी थेट गावात येऊन मालवाडा शिवारातील असलेल्या गायरान जमिनीवर स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा येत्या लोकसभा व नंतरच्या सर्वच निवडणुकांवर बहिष्कार घालून या गावातील एकही मतदार मतदानाचा हक्क बजावणार नाही.
- रंजना सुभाष दवणे, सरपंच,लिंबायत-नेर

मंगनाळीकरांचा ग्रामसभेत ठराव

  • धर्माबाद : तालुक्यातील मौजे मंगनाळी येथील गावात जाणाºया रस्त्याची दुरवस्था झाली असून जोपर्यंत रस्ता होत नाही. तोपर्यंत गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ९ मार्च रोजी झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. सदरील ठराव एकमताने मंजूर केला आहे.
  • धर्माबाद तालुक्यातील बहुतांश गावांतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. परंतु, मंगनाळी येथील गावात जाणाºया रस्त्याची दयनीय आवस्था झाली आहे. सदरील रस्ता दुरूस्त करण्यात यावा, यासाठी आमदार, खासदार व जि. प. सदस्याकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करण्यात आला आहे. परंतु सदरील रस्ता काही दुरूस्त झाला नाही. त्यामुळे गावकºयांत संताप व्यक्त केला जात आहे. सदरील रस्त्यावरून ये - जा करण्यासाठी गावकºयांना व वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन फिरावे लागते. आजपर्यंत अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. गावाच्या विकासासाठी कुठल्याच पक्षाच्या लोकांनी काही केले नाही. त्यामुळे गावकºयांनी वैतागून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
  • मंगनाळी येथील गावची लोकसंख्या जवळपास दोन ते अडीज हजार असून गावात जवळपास बाराशे मतदार आहेत. शुक्रवारी जागतिक महिला दिनानिमित्त गावात ग्रामसभा घेण्यात आले आहे. सभेत गावचा रस्ता होई- पर्यंत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकावा, असे योगेश पेंटाजी कोलोड यांनी सुचविले. त्यास अनुमोदन योगेश लक्ष्मण तालोड यांनी दिले. त्यानंतर सदरील ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सरपंच गंगाबाई पूजरोड, उपसरपंच, आनंदराव पाटील मानेलू, ललिता कानलोड, विमल आनंदा गायकवाड, मनोहर येवतीवाड, जयश्री सुरेश मोळे, ग्रामसेवक पपुलवाड, राजप्पा पाटील मानेलू यांच्यासह गावातील महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Boycott voting for road, crematorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.