वीजवाहिन्यांवरील फांद्या तोडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:17 AM2021-05-23T04:17:23+5:302021-05-23T04:17:23+5:30
देशमुख यांची मागणी नांदेड : खरिपात नुकसान होऊन पीक विम्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या ...
देशमुख यांची मागणी
नांदेड : खरिपात नुकसान होऊन पीक विम्यापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या हिमायतनगर, हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा सरसकट देण्यात यावा, अशी मागणी तुषार देशमुख यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
साखर सहसंचालकांना निवेदन
नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यासह नांदेड विभागातील बहुतांश साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकलेली आहे. या सर्व साखर कारखान्यांची ही रक्कम पेरणीपूर्वी अदा करावी, अशी मागणी ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
औषध विक्रेत्यांकडे दुर्लक्ष
नांदेड : कोविड महामारीच्या काळात डॉक्टरांप्रमाणे औषध विक्रेत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे. परंतु, कोरोना लसीकरणामध्ये औषध विक्रेत्यांकडे राज्य व केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याने औषध विक्रेता संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. औषध विक्रेत्यांना प्राधान्याने लस देण्यात यावी, अशी मागणी नांदेड जिल्हा औषधी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष अशोक गंजेवार, सचिव संतोष दमकोंडवार यांनी केली आहे.
खतांच्या किमतीबाबत संभ्रम
नांदेड : केंद्र शासनाकडून सर्व प्रकारच्या रासायनिक खतांवर सबसिडी वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खताच्या किमती कमी झाल्या आहेत. परंतु, काही व्यापारी शेतकऱ्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत जादा दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी खताचे नाव व त्याची किंमत असणारे फलक दुकानाच्या दर्शनी भागात लावावे, अशी मागणी छावाचे जिल्हाध्यक्ष दशरथ कपाटे यांनी केली आहे.
दूषित पाणीपुरवठा
नांदेड : शहरालगत असलेल्या ग्रामपंचायती वाडीअंतर्गत येणाऱ्या बहुतांश नगरांमध्ये ग्रामपंचायतीकडून दूषित पाणीपुरवठा केला जात आहे. कॅनॉल परिसरातील बहुतांश नगरांमध्ये नळाला गढूळ पाणी येत आहे. तसेच अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीही मिळत नाही.