पुन्हा सत्तेचे गाजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:14+5:302021-07-22T04:13:14+5:30
पुन्हा सत्तेचे गाजर १०५ आमदार निवडून येऊनही विराेधी बाकावर बसावे लागल्याचे शल्य भाजपच्या मंडळींना सातत्याने बाेचते. दुसरीकडे महाविकास आघाडी ...
पुन्हा सत्तेचे गाजर
१०५ आमदार निवडून येऊनही विराेधी बाकावर बसावे लागल्याचे शल्य भाजपच्या मंडळींना सातत्याने बाेचते. दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार सुस्थितीत चालत आहे. भाजपकडील आमदार फुटू नये, कार्यकर्ते पक्ष साेडून जाऊ नयेत म्हणून भाजपची नेते मंडळी सातत्याने ‘लवकरच आपले सरकार येणार’ असे सांगत आहेत. त्यासाठी वेगवेगळे मुहूर्तही दिले गेले. मात्र, प्रत्यक्षात हे मुहूर्त साधले गेले नाहीत. राज्यात सर्वच जिल्ह्यांत हा अनुभव आहे. नांदेडही त्याला अपवाद नाही. येथील प्रमुख भाजप नेत्याच्या पुत्राने दाेन दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा ‘महिनाभरात राज्यात भाजपचे सरकार येणार’ असा शब्द कार्यकर्त्यांना दिला. मात्र, सरकार येण्याची चिन्हे नाहीत, नेते आपली दिशाभूल करीत आहेत याची जाणीव आता कार्यकर्त्यांना हाेऊ लागली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते सुरक्षित राजकीय प्लॅटफाॅर्मच्या शाेधात आहेत.
अखेर पक्ष कार्यालय उघडले
जिल्हा भाजपमध्ये खासदार व महानगर प्रमुखाच्या एकतर्फी कारभाराविराेधात कार्यकर्त्यांमध्ये राेष आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना तर व्हाइसच नाही. पक्षाचे सर्व कार्यक्रम खासदाराच्या घरूनच चालतात, पक्ष कार्यालय उघडत नाही, अशी कार्यकर्त्यांची ओरड हाेती. ‘लाेकमत’ने मंगळवारी यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेऊन दुपारीच भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गाेजेगावकर यांनी पक्ष उघडून तेथे छाेटेखानी का हाेईना बैठक घेतली. सर्व तालुका अध्यक्षही त्याला उपस्थित हाेते. एवढ्या वर्षात पक्ष कार्यालयात झालेली ही बैठक ‘केवळ लाेकमत इफेक्ट’ असल्याच्या प्रतिक्रिया भाजपच्या गाेटातून ऐकायला मिळाल्या.