माहूर शहर व तालुक्यात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:48 AM2018-03-23T00:48:57+5:302018-03-23T11:43:50+5:30

माहूर शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय,सामाजिक संघटनांनी शेकडो पुराव्यासह १२ मार्च पासून नामफलक उभारण्याच्या मागणीच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरु केला असला तरी नगरपंचायत प्रशासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही़ त्यामुळे गुरूवारी माहूर कडकडीत बंद करण्यात आला़

Cluttering in Mahur city and taluka | माहूर शहर व तालुक्यात कडकडीत बंद

माहूर शहर व तालुक्यात कडकडीत बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीक्षेत्र माहूर : माहूर शहर व तालुक्यातील सर्वधर्मीय,सामाजिक संघटनांनी शेकडो पुराव्यासह १२ मार्च पासून नामफलक उभारण्याच्या मागणीच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरु केला असला तरी नगरपंचायत प्रशासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही़ त्यामुळे गुरूवारी माहूर कडकडीत बंद करण्यात आला़
श्रीक्षेत्र माहूर हे जगातील आदरणीय श्रद्धास्थान आहे. एकीकडे राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात जगातील सर्वाधिक उंचीचे स्मारक उभारत आहे. याउलट माहूर या तीर्थक्षेत्रावर मात्र शेकडो पुरावे असलेल्या छत्रपती शिवाजी चौकात स्मारक तर सोडाच केवळ नामफलक उभारण्यासाठी विरोध होऊन या तीर्थक्षेत्रावर अकारण तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी ३०० शिवभक्त नगरपंचायतसमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या प्रारंभीच झालेल्या चर्चेत न.प.चे उपाध्यक्ष राजकुमार भोपी व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी हा प्रश्न गावात स्फोटक होत असतांना देखील नगराध्यक्ष फिरोज दोसानी हे मुंबईला गेले असून ते आल्यानंतरच काय तो निर्णय होईल असे उत्तर दिल्याने शिवभक्तात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज शहरात नागरिक व व्यापाऱ्यांनी उत्स्फुर्त कडकडीत बंद पाळून पाठिंबा दिला़ जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी माहूर शहरात भेट देऊन अधिवेशन काळात विनाकारण खदखदणारा हा प्रश्न सोडवावा अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, योगी प.पु.श्याम भारती महाराज यांनी उपोषण मंडपात भेट देऊन भाजपा विधानसभा प्रमुख डॉ.अशोक पाटील सूर्यवंशी, संयोजक निरधारी जाधव, उपोषणकर्ते विकास कपाटे, विनोद पाटील सुर्यवंशी, अंकुर बाळस्कर, विजय आमले, देवकुमार पाटील. यशभाऊ खराटे यांची भेट घेऊन ३०० उपोषणार्थींना पाठबळ दिले आहे.
सदरील जागेचा वाद असा की, माहूर शहरातील शिवाजी चौका बाबतच्या नोंदी महसूल, न.प., पोलीस, धमार्दाय आयुक्त, विविध न्यायालयातील वाद प्रवादात हिंदू, मुस्लीम व वरील कार्यालयाची लेखी कबुली असतांना देखील विनाकारण राजकारण केले जात आहे. या प्रश्न निर्मितीनंतर माहूर न.प. ने एक ठराव घेऊन पाच नगरसेवकांची समिती गठीत केली होती़ यामध्ये दोन मराठा एक बौद्ध व दोन मुस्लीम नगरसेवकांचा समावेश होता. या पाचही जणांना कुठलीही सामाजिक जाणीव नसल्याने त्यांनी छत्रपतीच्या नाम फलकांसाठी चौकात जागा न देता दुसºयाच ठिकाणी शिफारस केल्याने लाखो शिवभक्त संतप्त झाल़े़ नगराध्यक्ष फिरोज दोसानी म्हणतात २८/०२/२०१८ च्या मासिक बैठकीत एक अनुपस्थित वगळता १८ ही नगरसेवकाच्या स्वाक्षºया आहेत़ असा खुलासा करून जिल्हाधिकारी नांदेड यांची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आता या नगरसेवकावर अथवा नगर पंचायतवर कुणाचाही विश्वास राहिला नाही़ पालकमंत्री रामदास कदम यांनी कणखर भूमिका घेऊन हा प्रश्न सोडविण्याची मागणी अशी हजारो शिवभक्तातून होत आहे़

दुसºया ठिकाणी शिफारस
माहूर न.प. ने एक ठराव घेऊन पाच नगरसेवकांची समिती गठीत केली होती़ यामध्ये दोन मराठा, एक बौद्ध व दोन मुस्लीम नगरसेवकांचा समावेश होता. या समितीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाम फलकांसाठी चौकात जागा न देता दुसºयाच ठिकाणी शिफारस केल्याने लाखो शिवभक्त संतप्त झाल़े़

Web Title: Cluttering in Mahur city and taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.