नांदेड : कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा यासाठी शिक्षण विभागाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. घरपोच आहार देण्याच्या उपक्रमाचे पालकांनीही स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी तूरडाळीसह चांगल्या दर्जाची मटकी देण्याची मागणी अनेक पालकांनी केली आहे.
विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नये, यासाठी घरपोच पुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने ऑगस्ट महिन्यामध्ये घेतला होता. त्यानुसार १ मे ते १५ जून या कालावधीत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबरपर्यंतचा पोषण आहारही जिल्ह्यातील बहुतांश शाळातील विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात आला आहे. आता डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीतील आहाराची पतिक्षा आहेलोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कोरोना प्रादूर्भावाच्या काळातही विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा यासाठी शिक्षण विभागाने केलेले नियोजन कौतुकास्पद आहे. घरपोच आहार देण्याच्या उपक्रमाचे पालकांनीही स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी तूरडाळीसह चांगल्या दर्जाची मटकी देण्याची मागणी अनेक पालकांनी केली आहे.
विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नये, यासाठी घरपोच पुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने ऑगस्ट महिन्यामध्ये घेतला होता. त्यानुसार १ मे ते १५ जून या कालावधीत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर नोव्हेंबरपर्यंतचा पोषण आहारही जिल्ह्यातील बहुतांश शाळातील विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात आला आहे. आता डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीतील आहाराची प्रतीक्षा आहे.
या आहेत तक्रारी
शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. मात्र, त्याचवेळी पोषण आहार योजनेतून देण्यात येणाऱ्या तूरडाळ आणि मटकीच्या दर्जाबाबत अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मसूर डाळ चांगल्या दर्जाची असते. मात्र, त्या तुलनेत तूरडाळ आाणि मटकीचा दर्जा खराब असल्याच्या प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केल्या आहेत. पालकांना दूरध्वनीवरून माहिती देऊन शाळांमध्ये आहाराचे वाटप करण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. मात्र, त्याचवेळी पोषण आहार योजनेतून देण्यात येणाऱ्या तूरडाळ आणि मटकीच्या दर्जाबाबत अनेक पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मसूरडाळ चांगल्या दर्जाची असते. मात्र त्या तुलनेत तूरडाळ आाणि मटकीचा दर्जा खराब असल्याच्या प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केल्या आहेत. पालकांना दूरध्वनीवरून माहिती देऊन शाळांमध्ये आहाराचे वाटप करण्यात येत आहे.