काँग्रेसच्या वतीने येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणा देत शनिवारी आंदोलन केले. शेतकऱ्यांविरुद्ध संसदेमध्ये मंजूर केलेले काळे कायदे, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढलेल्या किंमती, खाद्यतेल, डाळी व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ही गगणाला मिळाल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. या नागरिकांच्या भावना केेंद्र शासनापर्यंत पोेहचविण्यासाठी संपूर्ण देशभर काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. त्याचाच भाग म्हणून नांदेडमध्ये ही केंद्र शासनाविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांनी केले. या आंदोलनासाठी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किशोर स्वामी यांनी पुढाकार घेतला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनात नांदेड दक्षिणचे आ. मोहनअण्णा हंबर्डे, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, उपमहापौर मसूद खान, सभापती संगीता पाटील डक, डॉ. रेखा चव्हाण, मंगला निमकर, अनिता इंगोले, सुमती व्याहाळकर, कविता कळसकर, अनुजा तेहरा, मंगला धुळेकर, जयश्री राठोड, हाफिज, सतीष देशमुख तरोडेकर, शमीम अब्दुल्ला, अब्दुल लतीफ, नागनाथ गड्डम, अब्दुल गफार, रहिमखान, किशन कल्याणकर, सुरेश हटकर, रमेश गोडबोले, भालचंद्र पवळे, संतोष मुळे, सुमित मुथा, धीरज यादव, जगदीश शहाणे, नारायण श्रीमनवार, उमाकांत पवार, दिनेश मोरताळे, अजिज कुरेशी, नासेर, साहेबराव सावंत, सलाम चावलवाला, चाँदपाशा कुरेशी, मुन्तजीब, रहिम पठाण, संघरत्न कांबळे, अविनाश कदम, संजय वाघमारे, हंसराज काटकांबळे, ललीता कुंभार, पद्मा झंपलवाड, सुषमा थोरात, जेसिका शिंदे, अरुणा पुरी आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.