नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे एक आमदार कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 10:58 AM2020-06-27T10:58:27+5:302020-06-27T10:58:53+5:30
नांदेडच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नांदेड: माजी महापौर व त्यांच्या संपर्कात आलेले नांदेडचे एक काँग्रेस आमदार कोरोनाने बाधित झाले. नांदेडच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने रात्री नऊ वाजता त्यांनी शहरातील खाजगी रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करून घेतली. त्यावेळी शंका आल्याने त्यांनी लाळेचे नमुनेही दिले. मध्यरात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांच्या पॉझिटिव्ह अहवालामुळे काँग्रेस नेत्यांनाही धक्का बसला आहे. दरम्यान , शुक्रवारी १७ रुग्ण जिल्ह्यात आढळले.
जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ३४८ झाली. यामध्ये ११ डॉक्टर आहेत .यातील २७० जणांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले. गुरुवारी आणि शुक्रवारी प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होता, एकूण १६ जणांचा बळी आतापर्येंत गेला आहे.