Coronavirus : नांदेडमध्ये आणखी ४ जणांना कोरोनाची लागण ; रुग्णसंख्या पोहोचली ४४ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 07:44 PM2020-05-09T19:44:27+5:302020-05-09T19:45:15+5:30
सायंकाळी रहमत नगर येथील मयत महिलेच्या संपर्कातील जवळचे नातेवाईक असलेले तिघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले.
नांदेड: शहरात आज कोरोनाच्या आणखी ६ नव्या रुग्णांची भर पडली . जम्मू काश्मीर येथील दोन भाविक बाधित आढळल्याचा अहवाल सकाळी प्राप्त झाला होता. त्यानंतर सायंकाळी रहमत नगर येथील मयत महिलेच्या संपर्कातील जवळचे नातेवाईक असलेले तिघे बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तर माहूर येथील एक ६४ वर्षीय रुग्णही बाधित आढळलला. रहमतनगर येथील तिघात १४ वर्षांच्या दोन मुलांचा तर एका ३२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यामुळे बाधितांची संख्या आता ४४ वर पोहोचली आहे .
देगलूर नाका परिसरातील रहमत नगर येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिच्या संपर्कात असलेल्या काही नातेवाईकांची स्वॅब तपासणी करण्यात आली होती. दिनांक 3 मे रोजी त्यांची पहिली चाचणी निगेटीव्ह आली होती मात्र शनिवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात तीन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य डॉ. भोसीकर यांनी सांगितले.