coronavirus : नांदेडमधील कोरोना बळींची संख्या १४ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:55 AM2020-06-20T10:55:21+5:302020-06-20T10:56:04+5:30

६२ वर्षीय मृताचा अहवाल पॉझिटिव्ह

coronavirus: Corona death toll rises to 14 in Nanded | coronavirus : नांदेडमधील कोरोना बळींची संख्या १४ वर

coronavirus : नांदेडमधील कोरोना बळींची संख्या १४ वर

Next
ठळक मुद्देएका बाधिताची वाढ

नांदेड :  प्रयोगशाळेकडून शनिवारी १८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील १७ अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटीव्ह आलेला अहवाल ६२ वर्षीय मृत इसमाचा असल्याने कोरोना बळीची संख्या १४ इतकी झाली आहे.

शहरातील पिरबुऱ्हाणनगर भागातील गल्ली क्रमांक दोनमधील सदर ६२ वर्षीय वृद्ध इसम सेवानिवृत्त कर्मचारी होता. गुरूवारी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर स्वॅब घेण्यात आला होता. या स्वॅब नमुण्याचा तपासणी अहवाल आज शनिवारी सकाळी पॉझिटिव्ह आढळून आला. नांदेड जिल्ह्यात पहिला कोरोनाचा रुग्ण २२ एप्रिल रोजी पिरबुऱ्हाणनगर भागात आढळून आला होता. तो इसम कोरोनाचा जिल्ह्यातील पहिला रुग्ण व पहिला बळी ठरला होता. त्यानंतर त्या भागातील हा दूसरा बळी ठरला आहे.

बाधिताच्या संख्येतही एकने वाढ

कोरोना रुग्णांची संख्या ३०२  झाली आहे. दरम्यान, शनिवारी रात्री प्राप्त झालेल्या पाचपैकी तिघे हे इतर जिल्हयात पॉझिटीव्ह आढळल्यानंतर नांदेडमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे नांदेडमधील एकूण बाधितांची संख्या २९९ एवढीच असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: coronavirus: Corona death toll rises to 14 in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.