coronavirus : पळसा येथील मुलगी तर बारडमध्ये पोलीस अधिकारी कोरोनाग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 12:46 PM2020-06-30T12:46:57+5:302020-06-30T12:47:19+5:30

नांदेड जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३७४ वर गेली आहे.

coronavirus: A girl from Palsa and a police officer from Barad are corona positive | coronavirus : पळसा येथील मुलगी तर बारडमध्ये पोलीस अधिकारी कोरोनाग्रस्त

coronavirus : पळसा येथील मुलगी तर बारडमध्ये पोलीस अधिकारी कोरोनाग्रस्त

Next

नांदेड:  हदगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. तालुक्यातील पळसा येथील १६ वर्षाची मुलगी बाधित आढळली असून एका ३५ वर्षीय तरुणाचा अहवाल प्रलंबित आहे. बारड येथेही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला असून येथे एक पोलीस अधिकारी बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याने  जिल्ह्यातील दुसरा पोलिस पॉझिटिव्ह निघालेला आहे. सदर ५७ वर्षीय  सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नांदेडच्या छत्रपती चौकात वास्तव्यास होते तर बारड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

मागील दहा दिवसांपासून ते रजेवर होते. सोमवारी त्यांचा अहवाल  पॉझिटिव्ह प्राप्त झाला. यानिमित्ताने मुखेड पाठोपाठ बारडमध्ये पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
दरम्यान, हदगाव तालुक्यातील बाधित मुलीमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ३७४ वर गेली आहे. ही मुलगी मुंबई येथून नुकतीच परतल्याचे समजते. आजवर जिल्हयातील २८१ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, १७ जणांचा यापूर्वीच उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ७६ जणांवर विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

Web Title: coronavirus: A girl from Palsa and a police officer from Barad are corona positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.