CoronaVirus : नांदेडमध्ये जम्मू काश्मीरहून आलेले दोन भाविक कोरोना बाधित,रुग्णसंख्या ४०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 11:05 AM2020-05-09T11:05:12+5:302020-05-09T11:05:16+5:30
नांदेड शहरात आतापर्यंत चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नांदेड- शुक्रवारी शहरातील अबचल नगर भागातील आणखी तिघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर शनिवारी आणखी दोन रुग्णांची भर पडली असून नांदेडमधील रुग्णांची संख्या ४० झाली आहे.
नांदेड शहरात आतापर्यंत चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील तब्बल २० जणांना कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे लंगर साहिब, अबचल नगर, रहमत नगर आणि पिरबुऱ्हाण नगर हे भाग सील केले आहेत. शुक्रवारी सकाळी अबचल नगर येथील दोन महिला आणि रवी नगर येथील पुरुषाचा अहवाल पोसिटीव्ही आला होता. शुक्रवारी ५३ जणांचे स्वब पाठविण्यात आले होते. त्यात जम्मू काश्मीर येथून गुरुद्वारा दर्शनासाठी आलेल्या दोन भाविकांचा अहवाल पोसिटीव्ही आला आहे. या दोन्ही भाविकांवर पंजाब भवन येथील कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.