ठळक मुद्देजिल्ह्यात रुग्णसंख्या आता 323 वर पोहचली आहे.
नांदेड- नांदेड शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवारी सकाळी 41 जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले होते. त्यात दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाले, त्यामुळे रुग्णसंख्या आता 323 वर पोहचली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ही दिलासादायक आहे. आजपर्यंत 245 जणांना रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे. मंगळवारी एका पाच वर्षांच्या चिमुकल्यासह इतर तिघांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. त्यात आता नवीन दोन रुग्णांची भर पडली आहे. हे दोन रुग्ण शहरातील गुलजार बाग आणि देगलूर नाका भागातील रहिवाशी आहेत.