चेअरमनपदी डाकोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:08 AM2021-02-05T06:08:40+5:302021-02-05T06:08:40+5:30

राज्यस्तरीय पुरस्कार लोहा : कापसी बु. येथील मूळ रहिवासी शेषराव चावरे यांना उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक म्हणून पुरस्कार ...

Dakore as chairman | चेअरमनपदी डाकोरे

चेअरमनपदी डाकोरे

Next

राज्यस्तरीय पुरस्कार

लोहा : कापसी बु. येथील मूळ रहिवासी शेषराव चावरे यांना उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. चौरे यांनी रासेयोच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले. या पुरस्काराबद्दल त्यांचे अनेकांनी स्वागत केले.

दंडात्मक कारवाई

देगलूर : येथील पोलीस पथकाने शुक्रवारी विविध भागांत दुचाकी वाहनांची तपासणी केली. या तपासणीनंतर वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम पोलीस निरीक्षक भगवानराव धबडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.

विवाहितेचा छळ

लोहा : तालुक्यातील वरवंटी तांडा येथील विवाहितेच्या चारित्रावर संशय घेऊन तिने माहेराहून एक लाख रुपये आणावे म्हणून तिला छळणाऱ्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवला. तपास जमादार खाडे करीत आहेत.

नामफलकाचे अनावरण

भोकर : शहरातील तहसीलजवळ असलेल्या मार्गाचे बाळासाहेब ठाकरे मार्ग अशा नामफलकाचे अनावरण मोहन श्रीरामवार यांच्या हस्ते झाले. यावेळी सतीश देशमुख, परमेश्वर पांचाळ, नारायण पाटील, सुभाष नाईक, सुनील जाधव, मारुती पवार, श्याम वाघमारे, अक्षय पांचाळ उपस्थित होते.

निबंध स्पर्धेत यश

माहूर : येथील रेणुकादेवी महावद्यालयातील कला शाखेची विद्यार्थिनी पूनम ज्ञानेश्वर चव्हाण ही निबंध स्पर्धेत द्वितीय आली. स्वारातीम विद्यापीठाच्या वतीने ‘माझे ध्येय भ्रष्टाचारमुक्त भारत’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली. कुलगुरू उद्धव भोसले यांच्या हस्ते पूनमचा सत्कार करण्यात आला.

अभ्यासिका सुरू

कंधार : तालुक्यातील शिराढोण येथे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासिकेत विविध पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. ही अभ्यासिका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सोयीचे ठरत आहे.

शस्त्रक्रिया शिबिर

मुखेड : तालुक्यातील सावरगाव पिं. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २२ जानेवारी रोजी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर पार पडले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांच्या मार्गदर्शनाखाली १४ महिलांची कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. शिबिरासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

कदम यांच्या पॅनलचा विजय

अर्धापूर : तालुक्यातील धामदरी ग्रामपंचायत निवडणुकीत प्राचार्य सुनील कदम यांच्या नेतृत्वाखालील भास्कर पेरे विकास पॅनल विजय झाले. या पॅनलच्या दोन जागा यापूर्वीच निवडून आल्या होत्या. पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत याच पॅनलने बाजी मारली.

इस्लापूर बंद

इस्लापूर : दिवशी बु., ता. भोकर येथील घटनेच्या निषेधार्थ इस्लापूर येथे सर्वपक्षीयांच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. आरोपीला फाशी देण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी गोविंद अंकुरवार, कपिल करेवाड, काशीनाथ शिंदे, मारुती माहूरकर, बालाजी आल्लेवार, नंदू गायकवाड, मारुती हराळे, बालाजी दुरकुडे, आनंद नंदनवार आदी उपस्थित होते.

अवैध दारूची विक्री

हिमायतनगर : तालुक्यातील वाघी, विरसणी परिसरात अवैध दारूची विक्री जोरात सुरू आहे. पोलिसांनी संबंधिताविरुद्ध कारवाईची गरज आहे. तरुणांसह लहान मुलेही दारूच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. स्थानिक पोलीस याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत.

फाशी देण्याची मागणी

देगलूर : दिवशी बु. येथील घटनेतील आरोपीला फाशी देण्यात यावी या मागणीचे निवेदन भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आले. निवेदनावर प्रदेश उपाध्यक्ष जयदीप वरखिंडे, सुनील पाटील, अमृत पाटील, दिगंबर कदम, विलास येलावार, अशोक बच्चेवार, राजू पैलावार आदींची नावे आहेत.

Web Title: Dakore as chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.