हॅकर्सला कमिनशनवर पोहोचविला डेटा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:18 AM2021-01-23T04:18:03+5:302021-01-23T04:18:03+5:30
शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्सने लंपास केले. ...
शंकर नागरी सहकारी बँकेचे १४ कोटी ४६ लाख ४६ हजार रुपये आयडीबीआय बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून हॅकर्सने लंपास केले. या प्रकरणात सायबर सेलकडूनही तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात वजिराबद पोलिसांनी दिल्ली येथून एकाला आणि शेजारील कर्नाटकमधून दोन महिलांना ताब्यात घेतले. यातील एका महिलेचे नायजेरीयन फ्रॉड करणाऱ्याशी संबध असल्याचे उघडकीस आले आहे. दिल्लीच्या मोहनपुरा भागात नायजेरियन बहुल वस्ती आहे. या ठिकाणाहूनच हॅकिंगचे प्रकार केले जातात. तिन्ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आली आहे. आतापर्यंतच्या तपासावरून हॅकर्सला बँकेचा डेटा पुरविणारी एखादी टोळी असून, कमिशनवर ही टोळी हॅकर्सला ग्राहकांचा डेटा विकत असल्याची माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे, डेटा पुरविणाऱ्यामध्ये बँकेचाच कुणी सहभागी आहे काय? या दृष्टीनेही पोलिस तपास करीत आहेत.