लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : मुंबईत झालेल्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना केवळ दोन पाळ्या देऊन बोळवण करण्याचा निर्णय हा या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ़शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले.याबाबत जलसंपदा विभागाला निवेदन देण्यात आले आहे. त्यात विष्णुपुरी प्रकल्प हा यावर्षी शंभर टक्के भरला असून मुबलक जलसाठा आहे. रब्बी हंगामासाठी किमान चार ते पाच आवर्तने (पाणी पाळ्या) लागतात व एवढे पाणी असताना चुकीची आकडेवारी देऊन शेती सिंचनापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा हा डाव असल्याचे सांगून मागील दहा वर्षापासून नांदेड शहरासाठी कधीही २५ ते २७ दलघमीच्यावर पाणी लागले नाही. बाष्पीभवन (१०) दलघमी धरले तरीही व नदी काठावरील उपसा १० ते १२ दलघमी असून धरणात एकूण ८२ दलघमी १०० टक्के भरल्यावरचा साठा असतो.उर्वरित ३० ते ३२ दलघमी शिल्लक साठ्यात प्रतिपाणी पाळी ६ ते ७ दलघमी लागणारे पाणी फक्त पहिल्या पाणी पाळीला ७ ते ९ दलघमी लागेल. पण चार ते पाच पाळ्या देता येत असताना व यापूवीर्ही सन २०११, २०१२ व २०१३ च्या हंगामात त्या दिल्या गेल्याही होत्या पण, आता मात्र जाणीवपूर्वक शेती सिंचन टाळण्याचे प्रयत्न आहे, ही बाब चुकीची आहे.जलसंपदा विभागाकडून व जिल्हाधिकाऱ्यांकडून कोणतीही पाण्याची व आरक्षणाची चुकीची माहिती दिली, तरीही या भागातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही,याची खबरदारी घेतली पाहिजे होती.पण तसे झाले नाही. खरे तर यापूर्वी शेती सिंचन प्रकल्प पाण्याचे नियोजन आघाडी सरकारच्या काळात स्थानिक कालवा सल्लागार समितीकडे होते.या सरकरच्या काळात ते मुंबईत गेले.त्यांना फारशी माहिती नसते.गत वर्षीच्या हंगामात तर दोन महिने उशिरा पाणी सोडले. त्याचा शेतकऱ्यांना काहीही लाभ झाला नाही. यावर्षी तर दुष्काळाची स्थिती आहे. त्यामध्ये हा निर्णय आणखी शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे.
- दोन पाणी पाळ्या रब्बी हंगामात देण्याची पाठ थोपवून घेणाऱ्यांनी दोन पाण्यात कोणती रब्बीची पिके पूर्णपणे घेता येतात ते ही सांगावे. सगळीकडेच अंधेरी नगरी चौपट राजा अशी अवस्था जनतेची झाली आहे. खरीप हंगाम हातून गेलाच आहे.आता किमान रब्बीचा हंगाम जाऊ नये यासाठी गहू, हरभरा, पिकासाठी चार ते पाच पाणी पाळ्या सोडाव्यात अशी मागणी धोंडगे यांनी केली.
- उर्वरित ३० ते ३२ दलघमी शिल्लक साठ्यात प्रतिपाणी पाळी ६ ते ७ दलघमी लागणारे पाणी फक्त पहिल्या पाणी पाळीला ७ ते ९ दलघमी लागेल. पण चार ते पाच पाळ्या देता येत असताना व यापूवीर्ही सन २०११, २०१२ व २०१३ च्या हंगामात त्या दिल्या गेल्याही होत्या पण, आता मात्र जाणीवपूर्वक शेती सिंचन टाळण्याचे प्रयत्न आहे, ही बाब चुकीची आहे.