पाणीटंचाईने हिरावला सुटीचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 12:06 AM2019-03-26T00:06:09+5:302019-03-26T00:06:27+5:30
मार्च महिना उजाडला, की बच्चे कंपनीला वेध लागतात ते उन्हाळी सुट्यांचे़ मग उन्हाळी सुटीत काय काय मज्जा करायची हे अगोदरच ठरविले जाते़ शहरी भागात तर बच्चे कंपनीसाठी वेगवेगळे नियोजन केले जाते़ कोणी पोहण्याचे तर कोणी चित्रकला, निसर्गसहल असे वेगवेगळे नियोजन करुन सुटीचा आनंद घेतात़ मात्र,
बोधडी : मार्च महिना उजाडला, की बच्चे कंपनीला वेध लागतात ते उन्हाळी सुट्यांचे़ मग उन्हाळी सुटीत काय काय मज्जा करायची हे अगोदरच ठरविले जाते़ शहरी भागात तर बच्चे कंपनीसाठी वेगवेगळे नियोजन केले जाते़ कोणी पोहण्याचे तर कोणी चित्रकला, निसर्गसहल असे वेगवेगळे नियोजन करुन सुटीचा आनंद घेतात़ मात्र, ग्रामीण भागात हे चित्र पाहण्यास मिळत नाही़ शाळेला सुटी लागताच विद्यार्थ्यांना पाण्यासाठी आपल्या पालकांसोबत वणवण भटकावे लागणार आहे़ त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद हिरावला आहे़
ग्रामीण भागात कुठल्याच भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उन्हाळ्याच्या पूर्ण सुट्यांवर मुले घरीच राहतात़ आजच्या जमान्यात मामाकडे गावाला जाण्याची हिंमत कोणी करीतच नाही़ एकतर पाणीटंचाई, नाहीतर दरवर्षी आमच्याकडेच का यायचे, सुटीला हा प्रश्न मामी नक्कीच मामाला विचारत असेल़ त्यामुळे सुट्यात मामाच्या गावाला न जाता ग्रामीण भागातील मुले ही एकतर टीव्ही किंवा मोबाईल पाहण्यातच अख्खा दिवस घालवतात़ बोधडीत ग्रामपंचायतने एखादे बालउद्यान उभारले तर नक्कीच बच्चे कंपनी आणि ज्येष्ठांसाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण होईल़ त्यामुळे बालउद्यान तयार करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे़
ग्रामीण भागातील मुलांचा पाण्यासाठी संघर्ष
उन्हाळ्याची सुटी म्हणजे मौज मस्ती, धमाल व आनंदाला उधाण़़़ त्यामुळे मुलांना हे दिवस खूप आवडतात़ दप्तराचे ओझे व अभ्यासाचा ताण विसरून मुले आपल्या आवडीनुसार सुटींचा आनंद घेतात़ शहरामध्ये पालक आपल्या मुलांना सुट्यांचा सदुपयोग म्हणून विविध क्लास लावतात़ विविध कार्यशाळा, शिबिरामध्ये मुले प्रवेश घेतातक़ाही मुले उन्हाळ्याच्या सुटीत सहलीवर जातात़ अशा अनेक उपक्रमांनी शहरातील मुलांच्या उन्हाळी सुट्या साजऱ्या होतात़ तर दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी उन्हाळी सुटीत गावी परत गेल्यानंतर आपल्या आई, वडिलांसोबत पाण्याच्या शोधार्थ भटकतात़ सुट्यांचा कालावधी म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारची कसोटीचा काळ असतो़ त्यामुळे दरवर्षी येणारा उन्हाळा त्यांना नकोसा वाटतो़ यावर्षीच्या दुष्काळामुळे अनेक गावे स्थलांतरित होत आहेत़ पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या वाडी, वस्ती, तांड्यांवरील मुलांच्या सुट्याची मात्र होरपळ होत आहे़