बिलोली : येथील नगराध्यक्षा मैथिली संतोष कुलकर्णी यांनी २०१३-१४ या वर्षात न.प.च्या कामात अनियमितता आणि अपहार केल्याचा ठपका ठेवत त्यांना उर्वरित काळासाठी नगराध्यक्षपदावरुन पायउतार करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गुरुवारी सुनावला.बिलोली नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असून नगराध्यक्ष म्हणून मैथिली कुलकर्णी काम पाहत आहेत़ २०१३-१४ साली बिलोली नगरपरिषदेच्या कामांमध्ये नगराध्यक्षा कुलकर्णी यांनी प्रत्यक्षात कामे न करताच शासकीय निधीचा अपहार करणे, लेखाधिकारी यांना स्थानिक लेखावरील झालेला ४८ हजार रुपयांचा खर्च परवानगी न घेता अदा करणे तसेच प्रवास न करताच कागदोपत्री १ लाख २५ हजार रुपयांचा निधी उचलल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष सुभाष पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठांकडे केली होती. या प्रकरणात नगराध्यक्षा कुलकर्णी यांच्या विरोधात बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे़२०१७ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मैथिली कुलकर्णी या थेट नगराध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आल्या़ अखेर ३१ जानेवारी रोजी नगरविकास राज्यमंत्री डॉ़रणजित पाटील यांनी सन २०१३-१४ मधील प्रकरणात नगराध्यक्षा कुलकर्णी यांनी शासकीय निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेवला असून महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ५५ अ मधील तरतुदीनुसार उर्वरित कालावधी करिता अपात्र ठरविण्याचा निर्णय दिला़ दरम्यान, पालिकेच्या कामात अनियमितता झालेली नाही़ सदर निर्णय हा एकतर्फी असून तो अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया नगराध्यक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे़
बिलोलीच्या नगराध्यक्षा कुलकर्णी ठरल्या अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 12:59 AM
येथील नगराध्यक्षा मैथिली संतोष कुलकर्णी यांनी २०१३-१४ या वर्षात न.प.च्या कामात अनियमितता आणि अपहार केल्याचा ठपका ठेवत त्यांना उर्वरित काळासाठी नगराध्यक्षपदावरुन पायउतार करण्याचा निर्णय नगरविकास मंत्री डॉ.रणजित पाटील यांनी गुरुवारी सुनावला.
ठळक मुद्देअपहाराचा ठपका नगरविकास मंत्री रणजित पाटील यांचे आदेश