शहरातील गरजू वृत्तपत्र विक्रेत्यांना धान्य किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:14 AM2021-06-20T04:14:18+5:302021-06-20T04:14:18+5:30
अडचणीत असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबांना अन्न धान्यांची किट देऊन आम्ही तुमच्या सोबत असल्याची भावना शुभंकरोती फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी ...
अडचणीत असलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कुटुंबांना अन्न धान्यांची किट देऊन आम्ही तुमच्या सोबत असल्याची भावना शुभंकरोती फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी व्यक्त करून लॉकडाऊनच्या काळात वृत्तपत्र विक्रेते, ऑटो चालक, खासगी दुकानावर काम करणारी मुले, शाळेचे सफाई कामगार व रोडवर हातगाडे चालविणारे तरुण असे अनेक जण काम बंद असल्यामुळे आर्थिक अडचडीत आहेत. अशा गरजू व्यक्तींसाठी शुभंकरोती फाऊंडेशन नांदेड व देसाई फाऊंडेशन या दोन सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने नांदेड व परभणी जिल्ह्यातील गरजू कुटुंबाना अन्नधान्य किट वाटपाचा उपक्रम मागील एक महिन्यापासून सुरू आहे आणि याचाच भाग म्हणून नांदेड मधील लाईनवर काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना अन्नधान्य किट वितरित करण्यात आली, असेही चौधरी यावेळी म्हणाले.
यावेळी जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बालाजी पवार, उपाध्यक्ष गणेश वडगावकर, गणपत बनसोडे, चंद्रकात घाटोळ, सरदारसिंह चौहान, बाबू जल्देवार, संदीप कटकमवार, गजानन पवार, चेतन चौधरी, बालाजी चंदेल आदी पदाधिकारी व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.