नागरिक कृती समितीतर्फे पूरग्रस्तांसाठी मदत फेरी
नांदेड : महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे अनेक भागातील लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागे राहिलेल्या लोकांना शासन मदत करीत असून, याकामी माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या पुढाकाराने नागरिक कृती समिती, नांदेडच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मदतफेरीचे आयोजन केले होते. सराफा चौक, नांदेड येथून परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीस हिरवी झेंडी दाखवून सुरुवात झाली. यावेळी समितीचे समन्वयक डॉ. लक्ष्मण शिंदे, डॉ. हंसराज वैद्य, डॉ. कोकीळ, डॉ. डी. यू. गवई, डॉ. आर. एम. जाधव, डॉ. अशोक सिध्देवाड, डॉ. चिद्रावार, डॉ. पी. डी. जोशी, कॉ. नागापूरकर, कॉ. जांबकर, हरिष ठक्कर, प्रा. इनामदार, प्रा. धूतमल, कचरू रासे, अल्ताफ खान, सूर्यकांत वाणी, राजेंद्र शुक्ला, महेश शुक्ला, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, स्काऊट गाईड, डॉ. चिरोडे सर, डॉ. वडवळे उपस्थित होते.