डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लोककल्याणकारी समाजवाद गरजेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:17 AM2021-04-17T04:17:08+5:302021-04-17T04:17:08+5:30
अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन ...
अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३०व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ते बोलत होते.
डॉ. राऊत म्हणाले की, समाजवाद ही भांडवलशाहीच्या दोषांविरोधात निर्माण झालेली प्रतिक्रिया होती. समाजवादात लोककल्याणकारी राज्याच्या प्रस्थापनेचा आशावाद होता. भांडवलशाहीने जन्माला घातलेल्या विषमता, शोषण, ‘नाही रे’ वर्गाची पिळवणूक यांसारख्या अनेक समस्यांचा अंत करायचा असेल, तर उत्पादन साधने समाजाच्या मालकीची असणे आवश्यक आहे, अशी भूमिका बाबासाहेबांची होती. जाती व्यवस्थेमुळे केवळ श्रमाची विभागणी केली गेली नसून, श्रमिकांचीच विभागणी केली गेली आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
माणसातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्तरातील भिन्नतेमुळे निर्माण झालेले भेद अमान्य आहेत. अशा भेदरहीत समाजाकडून सर्व गरजा आणि गरजा पुरवणाऱ्या सेवा आणि संसाधनांवर नियंत्रण राहील हा मुख्य विचार ‘सर्वजण समान आहेत’ ही प्रेरणा देतो. इथे आर्थिक स्रोत कोणा एकाच्या मालकीचे नसून शासनाच्या मालकीचे असावेत. संपत्तीची खासगी मालकी हे शोषणाचे व दुःखाचे मूळ कारण आहे. महामंडळाचे पदाधिकारी डॉ. सीमा मेश्राम, छाया खोब्रागडे, सुनंदा बोदिले, अरविंद निकोसे, सुरेश खोब्रागडे, देवानंद सुटे, सुनील कुमरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रशांत वंजारे यांनी संयोजक म्हणून, तर गंगाधर ढवळे यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून काम पाहिले.