विष्णूपुरीच्या जलवाहिनी गळतीमुळे नांदेड शहरात दोन दिवसांआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:35 AM2018-03-22T00:35:41+5:302018-03-22T00:35:41+5:30
शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे़ एकीकडे अपु-या पाणी साठ्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सल्ले देणाºया प्रशासनाचे मात्र या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहराची तहान भागविणाऱ्या विष्णूपुरी धरणातून शेतीसाठी पाणीपुरवठा करणाºया जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती लागली आहे़ गेल्या अनेक महिन्यांपासून या जलवाहिनीतून पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे़ एकीकडे अपु-या पाणी साठ्यामुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे सल्ले देणाºया प्रशासनाचे मात्र या गळतीकडे दुर्लक्ष होत आहे़
विष्णूपुरी प्रकल्पात केवळ आठ टक्के जलसाठा असल्यामुळे नांदेडकरांवर पाणीटंचाईचे संकट आले होते़ त्यामुळे महापालिकेने शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता़ परंतु उपलब्ध साठा अपुरा असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच दिग्रस बंधाºयातून २० दलघमी पाणी नांदेडसाठी सोडले होते़ त्यातील १९ दलघमी पाणी विष्णूपुरीत पोहोचले़ त्यामुळे नांदेडकरांचा उन्हाळ्याच्या पाणीप्रश्न मिटल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला़ परंतु उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज आहे़ त्यासाठी पाण्याची होणारी गळती रोखण्याचे मोठे आव्हान मनपासमोर आहे़ परंतु नेमके त्याकडेच दुर्लक्ष केले आहे़ विष्णूपुरी प्रकल्पातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येणाºया जलवाहिनीला गेल्या अनेक दिवसांपासून ठिकठिकाणी गळती लागली आहे़ प्रकल्पापासून जवळपासे पावणेचार किमीपर्यंत ही जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ अनेकांनी जलवाहिनीला छिद्रे पाडून पाण्याची चोरीही सुरु केली आहे़ दिवसरात्र या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे़ अशाचप्रकारे पाण्याची नासाडी होत राहिल्यास उपलब्ध पाणीसाठा लवकरच संपणार अशी चिन्हे आहेत़ याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे़ दुसरीकडे जिल्ह्यातील चार तालुक्यांच्या भूजलपातळीत तब्बल तीन मीटरने घट झाल्याचा अहवाल आला आहे़ त्यामुळे ग्रामीण भागाला यंदा भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़
जलजागृती सप्ताहातच
पाण्याचा अपव्यय
एकीकडे प्रशासनाकडून १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा केला जात आहे. या सप्ताहात पाण्याचे महत्त्व सांगण्यासाठी, पाणी बचतीचे उपाय तसेच जनतेत जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. दुसरीकडे प्रत्यक्षात जलसंधारण विभागाच्या दुर्लक्षामुळेच लाखो लिटर पाणी वाया जात असताना कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत, याचे मात्र सामान्य नागरिकांना नवल वाटत आहे.