किनवट : तालुक्यातील १९ पैकी ८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे़ तर उर्वरीत प्रकल्पांत केवळ १० टक्के इतकाच जलसाठा आहे़ कोरड्या पडलेल्या प्रकल्पात गाळाचे प्रमाणही वाढल्याने व तलावातील गाळ काढण्यासाठी वाव असतानाही गाळ तलावाबाहेर पडला नाही़ त्यामुळे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे अभियानही कागदोपत्रीच राबविल्याचे चित्र आहे़ परिणामी किनवट तालुक्यात पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे़सन २०१८ च्या पावसाळ्यात अनियिमित झालेल्या पावसाने ६६ टक्के एवढीच नोंद झाली़ त्यातही इस्लापूर, शिवणी व जलधारा मंडळात केवळ ५० टक्क्यांच्या आतच पावसाची नोंद झाली आहे़ कमी पाऊस झाला असला तरी गाळाने रुतलेले प्रकल्प भरल्याची नोंद झाली़ मात्र उन्हाळ्यात या प्रकल्पाची अवस्था पाहिल्यानंतर भयानक चित्र दिसत आहे़ म्हणजे, बहुतांश प्रकल्पांत गाळ मोठ्या प्रमाणात साचल्याचे स्पष्ट झाले आहे़१९ प्रकल्पांपैकी डोंगरगाव या मध्यम प्रकल्पात केवळ (३.८१) टक्के इतकाच जलसाठा आहे़ कुपटी, मुळझरा, थोरा, नांदगाव, अंबाडी, वरसांगवी, सावरगाव हे सात लघू व शिरपूर बृहत असे आठ प्रकल्प कोरड्या स्थितीत असल्याचे ३० मे च्या पाणीपातळी अहवालावरून दिसून येत आहे़ जलधारा व मांडवी प्रकल्पात एकअंकी म्हणजे (१.९६) व (१.०९) इतकाच जलसाठा आहे़सध्या प्रकल्पात असलेला जलसाठा पुढीलप्रमाणे- नागझरी (१९.७०), लोणी (३२.२८), निचपूर (२०.११), सिंदगी (२३.२५), हुडी (१९.१५), पिंपळगाव (कि) (१७.२१), पिंपळगाव (भि) (१४.७४) असा आहे़ तर निराळा, लाक्कडकोट व सिंदगी (बोधडी) या साठवण तलावातील पाणीपातळी कमी झाली आहे़ बहुतांश प्रकल्प गाळाने भरल्याने येत्या काळातही पडणाऱ्या पावसाचे पाणी गाळाअभावी वाहून जाणार असल्याने पुढच्या वर्षीही प्रकल्पातील पाणीसाठा लवकरच घटून प्रकल्प कोरडे पडणार आहेत. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हे अभियान राबविले असते तर तलावातील गाळ बाहेर पडला असता आणि वाहून जाणारे पाणी प्रकल्पातच राहिले असते.पाण्यासाठी वणवणकिनवट तालुक्यात दरवर्षी चांगला पाऊस होतो़ मात्र मागील वर्षी केवळ ६६ टक्के पाऊस झाला़ त्यात प्रकल्पात गाळच अधिक असल्याने प्रत्यक्ष धरणे भरली असली तरी, पाणीसाठा मात्र कमी होता़ शासनाने राबविलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियानाचाही किनवटमध्ये फज्जा उडाला़ त्यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली़
किनवट तालुक्यातील आठ प्रकल्प जोत्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:30 AM
तालुक्यातील १९ पैकी ८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे़ तर उर्वरीत प्रकल्पांत केवळ १० टक्के इतकाच जलसाठा आहे़ कोरड्या पडलेल्या प्रकल्पात गाळाचे प्रमाणही वाढल्याने व तलावातील गाळ काढण्यासाठी वाव असतानाही गाळ तलावाबाहेर पडला नाही़
ठळक मुद्दे११ प्रकल्पांत दहा टक्क्यांवरूनही कमी पाणीसाठा